Home / महाराष्ट्र / Ajit Pawar GST meeting absent : अजित पवार सलग तिसऱ्यांदा जीएसटी बैठकीला गैरहजर

Ajit Pawar GST meeting absent : अजित पवार सलग तिसऱ्यांदा जीएसटी बैठकीला गैरहजर

Ajit Pawar GST meeting absent

Ajit Pawar GST meeting absent : दिल्लीत नुकत्याच झालेल्या वस्तु आणि सेवा कर (GST) परिषदेच्या महत्वपूर्ण बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा गैरहजर राहिले. याआधी २०२३ आणि २०२४ मध्ये झालेल्या बैठकांनाही अजित पवार हजर राहिले नव्हते.तेव्हापासून हा मुद्दा दिल्लीत चर्चिला जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या या बैठकीत ५ टक्के आणि १८ टक्के कर टप्पे हे सुत्र स्वीकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री उपस्थित होते. मात्र महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून अजित पवारांऐवजी महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) उपस्थित होत्या.त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

जीएसटी परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचे कोणतेही अधिकृत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने दिले नाही. अजित पवार यांचे मुंबईत पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत,असे त्यांच्या खात्याच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारी अजित पवार राज्य कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

जीएसटी हटवल्याने आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? समजून घ्या गणित

200 वर्ष जुन्या सिद्धिविनायक मंदिराचा होणार विस्तार! 100 कोटींचा बंगला विकत घेणार

लोकलसाठी क्यूआर तिकीट बंद ! रेल्वेचा नवा नियम