Manoj Jarange Patil – मराठा आंदोलन नेते (Maratha Movement)मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांवर आज जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात. त्यांनी पक्षात साप पोसले आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांवर (OBC leaders)जोरदार टीका करत मराठा समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही ओबीसींना आमचे लहान भाऊ, मोठे भाऊ समजत होतो. पण त्यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी बनवली आहे . टोळीच्या माध्यमातून मराठा समाजाशी विनाकारण शत्रुत्व निर्माण केले जात आहे. मराठ्यांना उच्च शिक्षण, नोकरी मिळाली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.विरोधकांनी कितीही डाव टाकले तरी त्यांना जिंकू देणार नाही. २०२९ च्या निवडणुकीत (2029 elections)मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना पाडायचे. छगन भुजबळांसारखे काही ओबीसी नेते सध्या खालच्या थराला गेले आहेत. यांना मराठ्यांचे अधिकारी निलंबित करायचे आहेत. मराठ्यांचा (Maratha community)जेवढा अपमान करता येईल, तेवढा प्रयत्न छगन भुजबळ करत आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात. सगळीकडून उठतात आणि बीडमध्ये (Beed)मोर्चा काढतात. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला माझे शब्द पटतील.
हे देखील वाचा –
जयपूर-अजमेर महामार्गावर२ तासांत २०० सिलिंडरचे स्फोट ; एकाचा मृत्यू तर पाच जखमी
दगडूशेठ गणपती ट्रस्टकडूनपूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी
स्वसंरक्षणासाठीच अक्षय शिंदेचा एनकाऊंटर पोलिसांना न्यायिक समितीने क्लीन चीट दिली