Ajit Pawar VS Sharad Pawar : राज्यात मागच्या काही वर्षात बरेच पक्ष फुटले. शिवसेने सारखा पक्ष वेगळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष देखील फुटला. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party)पक्षातील कौटुंबिक वाद महाराष्ट्रा (Maharashtra) पासून लपवले नाही. जनता दोन पक्षात भावनिकरीत्या विभागली गेली. लोकसभा, विधानसभा आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना या तीन निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात समोरासमोर लढत झाली. आणि आता यानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीच्या माध्यमातून चौथ्यांदा पुन्हा एकदा हि ‘कौटुंबिक’ लढाई पाहायला मिळणार आहे.
विधानसभा आणि माळेगाव कारखान्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळवून राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवार हे ‘हॅटट्रिक’ करणार का? किंवा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या या नगरपंचायतीच्या हद्दीतील मतदार भावनिक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला साथ देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बारामतीतील माळेगाव बुद्रुक ही या आधी ग्रामपंचायत होती. २०२१ मध्ये ग्रामपंचायतीचे रुपांतर हे नगरपंचायतीमध्ये केले गेले. त्यानंतर पहिल्यांदाच या नगरपंचायतीची निवडणूक होणार असून त्यानिमित्ताने पवार कुटुंबात चौथ्यांदा हि लढत रंगणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाल्यावर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष समोरासमोर उभे होते. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. पराभवानंतरही सुनेत्रा पवार यांची वर्णी मात्र राज्यसभेवर करण्यात आली.
या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीत विशेष लक्ष द्यायला सुरवात केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही हि अतिशय मनाची ठरली. उपमुख्यमंत्री पद हातात असताना देखील त्यांनी या कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी स्वत:चे नाव घोषित केले. त्यानंतर या निवडणुकीत चुरस अधिक वाढली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मालिका देखील सुरु झाली. मात्र, या निवडणुकीत अजित पवार यांचे पॅनेल अगदी सहजपणे निवडून आले.
विधानसभा आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यानंतर आता माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने दोन्ही गटांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.
या गट फुटीमुळे बरीचशी जनता मात्र अजूनही संभ्रमित पाहायला मिळते. मागच्या दोन वर्षात राजकारण हे कमालीचं ढवळून निघालेलं महाराष्ट्राने पाहिलं आहे. अनेक जागतिक मुद्दे आजही तसेच खितपत पडले आहेत. निवडणुकीच्या पलीकडे जाऊनही यात अनेक लोकांची भावनिकता अजूनही अडकली आहे. पण या सगळ्या पलीकडे जाऊन दोन्ही पक्षांनी एकत्र येत विकास करावा असे देखील बोलले जात आहेत. परंतु आता हि निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सर्वाधिक मतदान आपल्या पक्षाला मिळावे यासाठी नेत्यांची चालेली मेहेनत हि फक्त एख्याद्या पदासाठी आहे कि खरच लोक कल्याणासाठी आहे यावर देखील आता प्रश्न उपस्थित राहतात आहेत.
या कारखान्याच्या सभासदांसह २१ हजार २८४ मतदार हे नगरपंचायतीसाठी मतदान करणार असलायची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे बारामतीतील निवासस्थान हे या नगरपंचायतीच्या हद्दीत आहे. आणि जे अढळ मानले जाते, त्यामुळे मतदारांमध्ये भावनिकतेची लाट आहे. त्यामुळे मदतरांची भावनिकता कोणाच्या बाजूने कौल देईल हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
हे देखील वाचा – Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन