Akola Clash : अकोल्यातील बैदपुरा भागात गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकण्यात आली. दोन्ही गटातील नागरिकांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक व मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी पोलीस देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
अकोला शहरातील बैदपुरा भागात हा प्रकार आज घडला आहे. बैदपुरा भागात एका दुकानातून गोमास विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी मिळून सदरच्या दुकानावर कारवाई करण्यासाठी धाड टाकली होती. मात्र या धाडेनंतर दोन गटांमध्ये चांगलाच राडा झाला आहे.
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गट आमने- सामने आले असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. या प्रकारानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैयनात करण्यात आला. दरम्यान या राड्यात पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण झाल्याची खळबळजनक माहिती देखील समोर आली होती. मात्र मारहाण झाल्याचा दावा पोलिसांनी स्पष्टपणे नाकारला आहे.
हा राडा झाल्यानंतर या प्रकारची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर भाजप, विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्याची मोठी गर्दी केली होती. तसेच पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण हे देखील दाखल झाले असून थोड्याच वेळात भाजप आमदार रणधीर सावरकर पोलीस स्टेशनमध्ये पोहचणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
हे देखील वाचा – Gopichand Padalkar : पडळकरांच आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य; हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये..