Ambernath Election : महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राजकीय घडामोडींचा वेग आल्याचे दिसून आले आहे. याच पार्शवभूमीवर ठाणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अंबरनाथ शहरात उद्या नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच रविवार म्हणजेच २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळजवळ १५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शहरात ८०० पोलीस कर्मचारी, तसेच ११० अधिकारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, याशिवाय ४५० होमगार्ड शहरात नियुक्त करण्यात आले आहे. तब्बल १० वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्यामुळे विना अडथळा मतदारांना मतदान करता यावे आणि मतदानाचा टक्का अधिक वाढवण्यासाठी निवडणूक अधिकारी प्रयत्नशील आहेत.
शहरात २ लाख ५४ हजार ४७८ मतदार असून यात १ लाख १९,२९२ स्त्री मतदार, तर १ लाख ३५१६४ पुरुष मतदार आहेत. शहरात एकूण २७६ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. २७६ ईव्हीएम मशीन या मतदान केंद्रात ठेवण्यात आल्या असून यात ४९ ईव्हीएम मशीन राखीव ठेवल्या आहेत. पॅनल पद्धत आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एका मतदाराला तीन मत देता येणार असल्याने तीन मतांसाठी ९० सेकंदाला वेळ लागण्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
हे देखील वाचा – खिशात फक्त 5000 रुपये घेऊन शोरूमला जा आणि घरी न्या TVS Raider 125; पाहा EMI प्लॅन









