Home / महाराष्ट्र / Ambernath Nagarpalika Election : अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपाला धक्का..राष्ट्रवादीसोबत मिळून करणार सत्ता स्थापन

Ambernath Nagarpalika Election : अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपाला धक्का..राष्ट्रवादीसोबत मिळून करणार सत्ता स्थापन

Ambernath Nagarpalika Election : नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अंबरनाथचं (Ambernath Nagarparishad Election) राजकारण जोरदार चर्चेत असल्याचे दिसून आले आहे....

By: Team Navakal
Ambernath Nagarpalika Election
Social + WhatsApp CTA

Ambernath Nagarpalika Election : नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अंबरनाथचं (Ambernath Nagarparishad Election) राजकारण जोरदार चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. एका दिवसापूर्वी काँग्रेसचे १० नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेने (Eknath Shinde Shivsena) मोठा धक्का दिला असल्याचे समोर आले आहे. शिंदेंची शिवसेना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत (Ajit Pawar NCP) सत्ता स्थापन करणार असल्याचे देखील समोर आले आहे. काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले आहेत. याचबरोबर त्यांना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. आणि एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला असून एकूण ३२ नगरसेवकांचा गट अंबरनाथमध्ये स्थापन करण्यात आला आहे.

Ambernath Nagarparishad Election : भाजपकडून करण्यात आला होता सत्ता स्थापनेचा दावा
अंबरनाथमध्ये भाजपचे एकूण १६ नगरसेवक निवडून आले होते त्याचबरोबर शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने सुरवातीला काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र वरिष्ठांकडून त्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसचे १० नगरसेवक चलाखीने फोडले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता.

Ambernath Politics : श्रीकांत शिंदेंची खेळी, आणि भाजपाची हार?
भाजपच्या या खेळीनंतर सर्वाधिक जागा निवडून आलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत मात्र एकच खळबळ उडाल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे शिंदेंचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी खेळी करत अजितदादांच्या राष्ट्रवादीला शिंदेंच्या शिवसेनेसोबत घेतले. शिवसेनेचे सर्व नगरसेवक ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी गोळा झाले आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे २७, अजितदादांचे चार आणि एका अपक्षाच्या मदतीने त्यांनी आता सत्ता स्थापनेचा दावा केला असून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.

Ambernath Nagarparishad Election Result : अंबरनाथमधील पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे –

शिवसेना शिंदे -२७
राष्ट्रवादी – ०४
अपक्ष – ०१
भाजप – १६
काँग्रेस – १२( यातील १० जण भाजपमध्ये गेले)

Ambernath Shivsena Vs BJP : अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र होते. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा दणदणीत विजयी झाला होता. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या