Home / महाराष्ट्र / Strike Against BMC : पालिकेच्या विरोधात आंबोलीच्या रहिवाशांचे आझाद मैदानात उपोषण

Strike Against BMC : पालिकेच्या विरोधात आंबोलीच्या रहिवाशांचे आझाद मैदानात उपोषण

Strike Against BMC : मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation)के पश्चिम वॉर्डातील (K-West Ward) आंबोली (Amboli)येथील २६ रहिवाशांची घरे तोडल्यानंतर अद्याप...

By: Team Navakal
BMC
Social + WhatsApp CTA


Strike Against BMC : मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation)के पश्चिम वॉर्डातील (K-West Ward) आंबोली (Amboli)येथील २६ रहिवाशांची घरे तोडल्यानंतर अद्याप त्यांचे पुनर्वसन केलेले नाही. त्यांना तात्काळ प्रकल्पबाधित घरांच्या कोट्यातून पुनर्वसन केले जावे, या मागणीसाठी शिवसेना शाखा क्रमांक ६४ चे शाखाप्रमुख संतोष आंबोकर (Santosh Ambokar) यांनी रहिवाशांसह महापालिका विरोधात आझाद मैदानात (Azad Maidan)बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वारंवार पत्रव्यवहार करून न्याय मिळत नसल्याने अखेर उपोषण पुकारले असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेकडून अंधेरी ( Andheri West) येथील सी.टी.एस. क्र. ६१ आंबोली मधील ८२ घरे तोडली होती. मात्र आजपर्यंत पात्र लोकांना घरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रहिवाशांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इतर ठिकाणचे घरे भाडे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. याबाबत पालिका के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान (मालमत्ता) यांना प्रस्तावही दिला आहे.

मात्र त्यावर कोणतीही समाधानकारक कारवाई केलेली नाही. सतत पाठपुरावा करून देखील लोकांचा प्रश्न सरकारदप्तरी धूळ खात आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाखाप्रमुख संतोष आंबोकर यांनी रहिवाशांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.


हे देखील वाचा –

मलिक यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा

ठाण्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत

सहआरोपीच्या जामिनाचा संदर्भ देण्याला सुप्रीम कोर्टात आक्षेप ; उमर खालीद जामिनावर सुनावणी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या