Home / महाराष्ट्र / राज्यात रुग्णवाहिका चालकांचे उद्यापासून काम बंद आंदोलन

राज्यात रुग्णवाहिका चालकांचे उद्यापासून काम बंद आंदोलन

मुंबई – राज्यातील सरकारी १०८ रुग्णवाहिका (Ambulance) चालक हे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उद्या मंगळवार १ जुलैपासून काम बंद आंदोलन छेडणार...

By: Team Navakal
Ambulance drivers strike in the state

मुंबई – राज्यातील सरकारी १०८ रुग्णवाहिका (Ambulance) चालक हे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उद्या मंगळवार १ जुलैपासून काम बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष नागनाथ नरळे यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

शासन आणि ठेकेदारांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिका चालक विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. त्यांच्या समस्यांबाबत १३ मे रोजी आझाद मैदानामध्ये (Azad Maidan) आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते.आरोग्य सेवा संचालकांनी चर्चेच्या वेळी या वाहन चालकांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहारही केला. परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही, असे दिसून येत आहे. संघटनेनेही सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. १५ जूनपर्यंत चर्चा करून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सेवा पुरवठादारांना देण्यात आलेला होता. परंतु तरीही या मागण्याबाबत कुठलीही हालचाल शासन स्तरावरून किंवा सेवा पुरवठादार यांच्याकडून झालेली नाही.त्यामुळे १०८ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर उद्या १ जुलैपासून काम बंदचा इशारा दिला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या