Home / महाराष्ट्र / Amit Satam : ‘चाटम’ उल्लेखानंतर जुनी ऑडिओ क्लिप बाहेर; परंतु नव्याने होतय ट्रोलिंग- वादांचा सिलसिला कायम; अमित साटम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात..

Amit Satam : ‘चाटम’ उल्लेखानंतर जुनी ऑडिओ क्लिप बाहेर; परंतु नव्याने होतय ट्रोलिंग- वादांचा सिलसिला कायम; अमित साटम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात..

Amit Satam : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसागणिक अधिक तापत असून, सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या पार्शवभूमीवर...

By: Team Navakal
Amit Satam
Social + WhatsApp CTA

Amit Satam : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसागणिक अधिक तापत असून, सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या पार्शवभूमीवर आरोप–प्रत्यारोपांना उधाण आले असून, विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी परस्परांवर टीकेची झोड उठवत आहेत. या राजकीय उलथापालथीत अनेक कार्यकर्त्यांची पक्षांतरे घडत असून, त्यातून स्थानिक पातळीवरील समीकरणे सतत बदलताना दिसत आहेत. याचबरोबर, काही नेत्यांचे जुने भाषणांचे वा वक्तव्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडिया अकाउंटवर तसेच समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय चर्चांना आणि वादांना अधिक धार येत आहे.

अशातच आता भाजपा मुंबईचे अध्यक्ष अमित साटम अमित साटम यांचा एक जुना व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून परस्परांवर टीकेचे अस्त्र म्हणून जुन्या वक्तव्यांचा वापर केला जातो, त्याचाच एक भाग म्हणून या व्हिडिओकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या जुन्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या जुन्या व्हिडिओमुळे अमित साटम यांच्यावर मात्र जोरदार टीका होत आहे.

काही वर्षांपूर्वी भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेतील एका अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्या वेळी या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच प्रशासकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कालांतराने हा विषय मागे पडला असला, तरी आत हीच ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

ठाकरे बंधूंच्या वाचननाम्यात भाषण करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांच्या आडनावावर शब्दखेळ करत “चाटम” असा उल्लेख केला. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमित साटम यांनी आपणास वैयक्तिक शिवी दिली गेली नसून, या विधानातून संपूर्ण मराठी समाजाचा अपमान करण्यात आल्याचा दावा केला. “उद्धव ठाकरे यांनी मला नव्हे, तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे,” असे साटम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नव्याने धार मिळाली आहे.

दरम्यान, अमित साटम यांच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ घेत समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण त्यांच्या भूमिकेवर टीका करत आहेत, तर काहींनी याआधी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा दाखला देत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता साटम हे पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहेत.

भाजपचे आमदार अमित साटम यांच्याशी संबंधित एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप काही काळापूर्वी समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये मुंबई महानगरपालिकेतील एका अभियंत्याशी आमदार साटम अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना त्याच्याशी आणि अपमानास्पद बोलत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत होते. या प्रकारामुळे आत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या भाषाशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.

या प्रकरणात संबंधित अभियंत्यांनी गंभीर आरोप करत आमदार अमित साटम यांनी कामाच्या संदर्भात दबाव टाकून पैशांची मागणी केल्याचा दावा केला होता. पैसे न दिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही अभियंत्यांचे म्हणणे होते.

विशेष म्हणजे, के-पश्चिम विभागातील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) या दोन अधिकाऱ्यांना आमदार साटम यांनी शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर आला होता.

अमित साटम हे भाजपकडून मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची भाषा आणि वर्तणूक अपेक्षित नसते, अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून उमटली होती. आणि आता देखील काहीशी तशीच परिस्थिती असल्यचे देखील चित्र आहे.

भाजपचे आमदार अमित साटम यांच्याशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवीगाळ केल्याचे आरोप ठामपणे फेटाळले होते. या ऑडिओ क्लिपमधील केवळ सुरुवातीचा आवाज आपला असून, त्यानंतर ऐकू येणारा आवाज आपला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. संबंधित ऑडिओमध्ये ज्या संभाषणातून शिवीगाळ होत असल्याचा आरोप केला जात आहे, तो भाग एडिट किंवा मॉर्फ करून जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आल्याचेही साटम यांनी स्पष्ट केले होते.

आमदार साटम यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अभियंता पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून जवळपास दहा महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हा कथित संभाषणप्रकार किमान एक वर्ष जुना असण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्वरूपाचे कोणतेही संभाषण आपल्या आठवणीत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण महापालिकेतील अधिकाऱ्यांशी कामाच्या अनुषंगाने चर्चा करतो; मात्र अपशब्दांचा वापर केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले होते.

या प्रकरणामागे एका कथित घोटाळेबाज अभियंत्याचा आपल्याविरोधात रचलेला कट असल्याचा आरोप आमदार साटम यांनी केला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर आपण आवाज उठवल्यामुळे बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने ऑडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर पसरवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही केली होती.

भाजपचे आमदार अमित साटम हे मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असतानाच त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त घटनांमुळे ते यापूर्वीही चर्चेत आले आहेत. काही काळापूर्वी त्यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते पोलिस कर्मचारी आणि फेरीवाल्यांशी अर्वाच्य भाषेत बोलताना दिसत होते. या व्हिडीओमुळे सार्वजनिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हा प्रकार जुहू येथील मिठीबाई महाविद्यालयाजवळील रस्त्यावर घडल्याचे सांगण्यात येते. त्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांकडून अतिक्रमण होत असल्याचा आरोप आमदार अमित साटम यांनी केला होता. रस्त्यावर वाढलेल्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी त्यावेळी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले.

मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा संबंधित फेरीवाल्यांनी आमदार अमित साटम यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. साटम आपल्याकडून नियमित हप्त्यांची मागणी करत असल्याची तक्रार फेरीवाल्यांनी थेट पोलिसांकडे दाखल केली होती. या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच वादग्रस्त बनले आणि आमदार व फेरीवाले यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला.

एकीकडे अतिक्रमणाचा मुद्दा आणि दुसरीकडे हप्तेवसुलीचे आरोप, यामुळे या घटनेने राजकीय रंग धारण केला. लोकप्रतिनिधींची भाषा, त्यांचे वर्तन आणि प्रशासकीय यंत्रणेशी असलेले संबंध यावर प्रश्न उपस्थित झाले. या व्हायरल व्हिडीओनंतर आमदार साटम यांची प्रतिमा आणि त्यांची कार्यपद्धती यावर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. या प्रकारामुळे सार्वजनिक जीवनातील शिस्त, संयम आणि जबाबदारी यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या सर्व पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि त्यांची आचारसंहिता याबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. वारंवार वादग्रस्त वक्तव्ये, अर्वाच्य भाषेचे आरोप, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अथवा सामान्य नागरिकांशी असभ्य वर्तन केल्याचे आरोप समोर येत असताना, अशा व्यक्तींना पुन्हा आमदारकीच्या खुर्चीवर बसवणे कितपत योग्य आहे, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

लोकशाही व्यवस्थेत आमदार हा जनतेचा प्रतिनिधी असतो आणि त्याच्याकडून संयमित, सुसंस्कृत व जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. मात्र, जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीभोवती सातत्याने वाद, आरोप आणि गैरवर्तनाच्या घटना घडत राहतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही होतो. मात्र या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आमदार अमित साटम पुढील काळात या आरोपांना आणि निर्माण झालेल्या वादांना कशा पद्धतीने सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस; ‘हे’ आहे कारण

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या