Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहनतर्फे सोमवारी मुंबईतील चर्चगेट येथे नवीन महाराष्ट्र भाजप कार्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी या समारंभाला उपस्थित होते. भाजपची हि बहुमजली कार्यालय इमारत नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाच्या धर्तीवर उभारली आहे.
“योजनेनुसार, नवीन इमारत चर्चगेट येथील भूखंडावर बांधली गेली आहे. ती तांत्रिकदृष्ट्या प्रगत, प्रशस्त आणि पक्षाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकतांनी सुसज्ज आहे अशी माहिती समोर आली आहे. नवीन इमारतीत बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत.
भारत जागतिक सागरी नेता म्हणून उदयास येत असल्याने, ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या ऐतिहासिक पाच दिवसांच्या कार्यक्रमात अमित शहा मुख्य भाषणही देतील. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (MoPSW) द्वारे इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA) च्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. देशाची सागरी शक्ती बळकट करणे आणि प्रदर्शित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शाश्वत सागरी वाढ, व्यापार विस्तार आणि भारताच्या “नील अर्थव्यवस्थेच्या” विकासावर चर्चा करण्यासाठी हे शीर्ष उद्योग नेते, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांना आकर्षित करेल.
या भूमिजनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांसाठी आज आनंदाचा दिवस. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं एक तरी कार्यालय असणार. अनेक अडचणी पार करून हि जागा मिळवली. असेही ते या भाषणादरम्यान म्हणले.
अमित शहांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात भाजप कार्यकर्त्यांसाठी आजचा शुभ दिवस आहे. पुढे ते म्हणतात कार्यालय आमच्यासाठी मंदिर आहे. महाराष्ट्रात आज भाजपची नवीन सुरवात आहे असेही ते म्हणाले. पुढे ते असाही म्हणतात भाजप कोणाच्या कुबड्या घेऊन चालत नाही, भाजप स्वतःच्या सिद्धांतावर चालतो असेही ते या भाषणादरम्यान म्हणाले.
हे देखील वाचा – Nashik Crime : नाशिकच्या कारागृहात कैद्याची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट..









