Amit Shah – मराठवाड्यासह (Marathwada)राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall)आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या शेतकर्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून अजूनही मदत जाहीर झालेली नाही. त्यावरून विरोधक सराकरावर टीका करत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister)अमित शहा महाराष्ट्रातील (Maharashtra)अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते.
यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत ते म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा, त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील. त्याचबरोबर त्यांनी गुजरातच्या माधवपुरा मर्केंटाईल सहकारी बँकेचा उल्लेख करत दिवंगत डॉ. बाळासाहेब विखे पाटील (Dr. Balasaheb Vikhe Patil) यांचे कौतुक केले.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज अहिल्यानगरच्या प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ()सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ झाला. सहकार चळवळीचे शिल्पकार आDr. Vitthalrao Vikhe Patilणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. यासोबतच, देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प यांचे उद्घाटनही अमित शहा यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच राज्यातील इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनही घेतले.
अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar)अमित शहा म्हणाले की, अहिल्यानगर ही भूमी सहकार क्षेत्रातील पंढरी मानली जाते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्यांचे सर्व जीवन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. याबाबत मी सविस्तर बोलणार आहे. मात्र, या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झालेले आहे. २०२५-२६ वर्षांसाठी केंद्र सरकारने ३,१३२ कोटींचा वाटा महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामधील १,६३१ कोटी रुपये पंतप्रधान मोदींनी एप्रिलमध्ये दिले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही उपाययोजना करत आहे. २,२१५ कोटींचा रिलीफ फंड महाराष्ट्र सरकारने दिला आहे. पूरग्रस्तांना १० हजार रुपयांची रोख मदत आणि २५ किलो धान्य महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. तसेच बँकांना कर्जवसूलीदेखील थांबवण्यास सांगितले आहे.
शहा पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकाच्या त्रिमूर्तीमधील (फडणवीस, शिंदे, पवार) कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. मला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवले आणि विचारले की केंद्र सरकार महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करणार? तिघांची कालच माझ्याबरोबर एक महत्त्वाची बैठक झाली. तेव्हा मी पंतप्रधान मोदींच्या वतीने त्यांना आश्वासन दिले की, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवावा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत. ते मदत जाहीर करतील. कारण महाराष्ट्राच्या जनतेने शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार निवडून दिलेले आहे.
माधवपुरा बँक घोटाळा काय होता? (Madhavpura Bank Scam)
अमित शहा यांनी आपल्या भाषणात माधवपुरा बँकेचा उल्लेख केला, या बँकेच्या घोटाळ्यामुळेच काही वर्षांपूर्वी अमित शहा अडचणीत सापडले होते. गुजरात सीआयडीचे (CID)अतिरिक्त डायरेक्टर जनरल (पोलीस) कुलदीप शर्मा (Kuldeep Sharma)यांनी १ ऑगस्ट २००५ रोजी गुजरात सरकारला या घोटाळ्यासंदर्भात तीन पानी अहवाल सादर करत तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांची लाचखोरीच्या आरोपाखाली चौकशीची परवानगी मागितली होती, पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विनंतीला उत्तरच दिले नाही.
मात्र, कुलदीप शर्मा यांची बदली करण्यात आली. गुजरातच्या माधवपुरा मर्केंटाईल सहकारी बँकेतून शेअर दलाल केतन पारेखने १२०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले, परिणामी बँक बुडाली आणि बँकेचा परवाना रद्द झाला.
या प्रकरणी केतन पारेख यांना अटक होऊ नये, यासाठी अमित शहांनी अडीच कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप बँकेचे एक खातेदार शहा यांनी केला होता. गुजरात सीआयडी या प्रकरणाचा चौकशी करीत होती. मात्र, अमित शहांच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला नाही. या माधवपुरा बँकेचा उल्लेख करत अमित शहा अहिल्यानगरमध्ये म्हणाले की, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये खूप चांगले काम केले.
गुजरातमधील माधवपुरा सहकारी बँक बुडाल्यानंतर मी त्यांना दोनदा भेटलो, तेव्हा ते अर्थ राज्यमंत्री होते. त्यांनी माधवपुरा मर्केंटाईल सहकारी बँकेला पॅकेज देण्यासाठी रिझर्व्ह बँकेला पटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या योगदानामुळे गुजरातमधील २२५ सहकारी बँका वाचल्या आणि मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर आल्या. त्यामुळे, मी या कार्यक्रमात डॉ. बाळासाहेब विखे -पाटील यांचेही मनापासून स्मरण करू इच्छितो.
हे देखील वाचा –
दार्जिलिंगमध्ये पूल कोसळून ७ मृत्यूमुखी
बेकायदेशीर अटकेला आक्षेप ! सरकारला १ लाखांचा दंड ! उच्च न्यायालयाची कारवाई