Home / महाराष्ट्र / Amit Thackeray : अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच दाखल झाला गुन्हा..

Amit Thackeray : अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच दाखल झाला गुन्हा..

Amit Thackeray : राजकीय वर्तुळात दर दोन दिवसाला काही ना काही उलथापालथ हि होतच असते अशीच एक बाबा नेरुळ मध्ये...

By: Team Navakal
Amit Thackeray
Social + WhatsApp CTA

Amit Thackeray : राजकीय वर्तुळात दर दोन दिवसाला काही ना काही उलथापालथ हि होतच असते अशीच एक बाबा नेरुळ मध्ये देखील घडली आहे. महापालिकेची परवानगी न घेता नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी राज ठाकरेंचे सुपुत्र तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरेंवर केलेला हा पहिलाच गुन्हा आहे. अमित ठाकरेंबरोबरच आणखीन ४० मनसे कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ६ महिन्यापूर्वीच नेरुळमध्ये बसवला होता. मात्र महापालिकेच्या वतीने या पुतळ्याचे अनावरण करायला मुहूर्त मिळत न्हवता. म्हणूनच रविवारी दुपारी मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईत आले असता, त्यांनी हा कापडात गुंडाळलेला महाराजांचा पुतळा पाहिला. आणि गुंडाळल्या कापडावरही धूळ जमा झाली होती. आणि त्यानंतर पुतळ्यावरील कापड काढून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

पोलिसांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही हट्टाने मनसे कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे अनावरण करण्यात आले आहे. शिवाय महापालिकेकडून रीतसर या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते, असे पालिकेने स्पष्ट केले आहे .

आयुष्यातील पहिला गुन्हा महाराजांसाठी असेल तर अभिमान आहे- अमित ठाकरे

‘इतके दिवस हा पुतळा याच अवस्थेत आहे. म्हणून पुतळ्याचे अनावरण केले आयुष्यातील पहिला गुन्हा महाराजांसाठी दाखल होत असेल, तर याचा मला अभिमानच वाटेल,’ अशी प्रतिक्रिया देखील अमित ठाकरे यांनी दिली.

नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी याबाबत अधिक स्पष्टता देईल आहे, नेरुळ चौकात सुमारे ४६ लाख रुपये खर्चून बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून नवी मुंबई महापालिकेशी सतत संपर्क साधत होते. परंतु संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे सराईतपणे दुर्लक्ष करत होते, पुतळ्याला झाकण्यासाठी वापरलेले कापड योग्य स्थिती न्हवते अर्थात ते घाणेरडे झाले होते. त्यामुले अमित ठाकरे यांनी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पुढाकार घेतला.

नवी मुंबई महापालिकेने प्रेस रिलीज जारी केले आहे, आणि आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात पुतळ्याभोवतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि ते पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुतळ्याची अधिकृत स्थापना लवकरच केली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता आणि पूर्वसूचना न देता पुतळ्याचे अनावरण करणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत बेकायदेशीर आणि अनधिकृत असलयाचे देखील ते म्हणाले.


हे देखील वाचा –

Vasai Student Death : Gen zना नव्या शिक्षकांच्या शिक्षा असह्य

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या