Home / महाराष्ट्र / ABVP–MNS : पुण्यात अभाविप – मनविसे वाद ! अमित ठाकरेंची आयुक्तांशी चर्चा

ABVP–MNS : पुण्यात अभाविप – मनविसे वाद ! अमित ठाकरेंची आयुक्तांशी चर्चा

ABVP–MNS – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) यांच्यात...

By: Team Navakal
ABVP–MNS

ABVP–MNS – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) यांच्यात काल पोस्टरवरून वाद झाला होता. या प्रकरणी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug police) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray)यांनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्याशी चर्चा केली.

वाडिया महाविद्यालयामध्ये (Wadia College)अभाविपकडून बॉयकॉटचे पोस्टर (Boycott Posters)लावण्यात आले. यात नॅशनल स्टूडेंट यूनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे नाव आणि बहिष्कार (बॉयकॉट) करा असे लिहिण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ मनविसेने सदाशिव पेठेतील अभाविपच्या कार्यालयात घुसून पॉवर ऑफ मनविसे असे पोस्टर लावले. सोबतच कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार आंदोलन केले. यावेळी दोन्ही गटात वाद झाला.

यावर अमित ठाकरे म्हणाले की, दुसऱ्यांच्या कामात येण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. काल एका कार्यालयाला टाळे ठोकले आहे. त्यांनी लावलेल्या पोस्टरबाबत मी पोलीस आयुक्तांशी (Police Commissioner)बोललो आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही (CCTV)फुटेज आहे. यातील ती मुले त्या संघटनेची निघाली तर त्यांची सर्व कार्यालये बंद करावी लागतील. यापुढे आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट अभाविप लिहिले तर चालेल का? कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे.


हे देखील वाचा –

रमाबाई नगर रहिवाशांना दोन वर्षांत घरे बनवून देऊ ! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

तुरुंगात गेल्यास मंत्री पदमुक्त ; इंडिया आघाडीचा समितीवर बहिष्कार

कफ सिरपमुळे यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या बालकाचा मृत्यू? नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

Web Title:
संबंधित बातम्या