Amitabh Bachchan : बॉलिवूडचा OG खरा हिरो अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, अवघ्या जगभरात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात त्यांच्याबद्दलची कोणतीही बातमी चात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचीच असते अशाच अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा वाढवण्यानंतर अमिताभच्या घराबाहेर २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पोलिस सुरक्षा का वाढवण्यात आली आहे, याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे याबाबतच कारण अद्याप अस्पष्ट आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर पोलिस सुरक्षेसह रस्त्यावर बॅरिकेडिंग देखील करण्यात आलं आहे.
रविवारी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर बिग बींच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळी होती, त्यामुळे रविवारी देखील पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे बिग बी हे सध्या चांगलेच चर्चेत असल्याचं दिसून येत.
हे देखील वाचा –
Donald Trump: अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले









