Home / महाराष्ट्र / Amruta Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मराठी की अमराठी? अमृता फडणवीस म्हणाल्या…

Amruta Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मराठी की अमराठी? अमृता फडणवीस म्हणाल्या…

Amruta Fadnavis Mumbai Mayor Statement : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याची उत्सुकता...

By: Team Navakal
Amruta Fadnavis
Social + WhatsApp CTA

Amruta Fadnavis Mumbai Mayor Statement : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवले असले तरी, सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांच्या साथीची गरज आहे.

अशातच, मुंबईचा पुढचा महापौर कोण असणार आणि तो कोणत्या भाषिक पार्श्वभूमीचा असेल, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“महापौर महायुतीचा मराठी माणूसच”

मुंबईच्या महापौरपदावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूसच होणार.” गेल्या काही दिवसांपासून महापौर मराठी की अमराठी, यावरून विरोधकांकडून टीका केली जात होती. मात्र, अमृता फडणवीस यांच्या या स्पष्टोक्तीमुळे महायुतीचा अजेंडा स्पष्ट झाला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती मुंबईवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

संजय राऊतांच्या टीकेला सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी “मुख्यमंत्री दावोसला पिकनिकसाठी गेले आहेत,” अशी खोचक टीका केली होती.

या टीकेला अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “संजय राऊत नेमकी कोणती भाषा बोलतात, हेच मला कळत नाही. जो माणूस सकाळी 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत राज्यासाठी गुंतवणूक आणण्यासाठी बैठका घेतो, त्याला ‘पिकनिक’ म्हणणे निरर्थक आहे.”

पिकनिकवरून मिश्किल टोला

यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी करत राऊतांना टोला लगावला. “देवेंद्र फडणवीस हे पिकनिकला माझ्याशिवाय आणि मुलगी दिविजाशिवाय कसे जातील?” असे म्हणत त्यांनी राऊतांचे सर्व दावे फोल ठरवले. दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येईल आणि राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

22 जानेवारीकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, मुंबईसह 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी मंत्रालयात निघणार आहे. या सोडतीनंतरच मुंबईचा महापौर कोणत्या प्रवर्गातील असेल, हे स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग येईल.

Web Title:
संबंधित बातम्या