Andheri Gundavali Metro : अंधेरीत गुंदवली मेट्रो स्थानकात बेवारस संशयास्पद बॅग सापडल्याने मोठा गोंधळ उडाला. गुंदवली मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर एक काळ्या रंगाची संशयास्पद बॅग आढळली असल्याचे समोर आले आहे. या संशयास्पद बॅगेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले. या बॅगेत काही घातपात होण्यासारखी संशयास्पद वस्तू ठेवल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले.
मेट्रो स्थानकाच्या पहिल्या माळ्यावर तिकीट काऊंटर जवळच एक काळ्या रंगाची संशयित बॅग आढळली. या बॅगेत काही घातपात होणाऱ्या वस्तू असल्याचा असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी कामाचा वेग वाढवला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून नागरिकांना बाजूला केलं होतं.
दरम्यान, या ठिकाणचा सविस्तर तपास करण्यात आला. अखेर तपास केला असता काळ्या रंगाच्या संशयित बॅगेत काहीच संशयास्पद वस्तू नसल्याचे निष्पन्न झाले. आणि यानंतर आता परिसरात शांततेचं वातावरण आहे.
हे देखील वाचा –30 Minutes Of Exercise : ३० मिनिटांचा व्यायाम मधुमेहाशी लढण्यास कशी मदत करतो?









