Anjali Damania & Ajit Pawar : पुण्याच्या मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी निर्वाणीचा इशारा दिला. २४ तासांत पवार यांचा राजीनामा घ्या, अन्यथा आपण उद्या दिल्लीला (Delhi) जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे तक्रार करू, असे दमानिया यांनी बजावले. शहांनी भेट न दिल्यास त्यांच्या कार्यालयातच ठिय्या ठोकू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंढवा येथील बोटॅनिकल गार्डनसाठी आरक्षित असलेली ४० एकर जमीन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने विकत घेतल्यावरून गेले काही दिवस वाद सुरू आहे. आज दमानिया पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन पवार यांच्यावर हल्ला चढवला. अमेडिया कंपनीने सरकार दफ्तरी सादर केलेली काही कागदपत्र दमानिया यांनी दाखवली. या कागदपत्रांवरून असे स्पष्ट दिसते की अमेडिया कंपनीने कुठेही जमीन विकत घेण्याचा उल्लेख केलेला नाही.
त्या पुढे म्हणाल्या की, केवळ आपल्याला एक डेटा सेंटर सुरू करायचे आहे, असे सांगून अमेडिया कंपनीने इच्छापत्र (एलओआय) मिळवले आणि त्या आधारे जमिनीचा व्यवहार करून सरकारकडून मुद्रांक शुल्कमाफी मिळवली.अवघे ५०० रुपये भरून अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला. १६ जून रोजी केंद्र सरकारकडून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर जमिनीचा ताबा कोणीतरी घेत आहे, असे कळवण्यात आले होते. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी काहीच हालचाल केली नाही. तसेच पालकमंत्री अजित पवार यांना याची माहिती दिली नाही, हे कदापि पटणारे नाही. या सर्व गैरव्यवहारात अजित पवार यांचाच हात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ उप मुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी दमानिया यांनी केली.
हे देखील वाचा –
शेवगा शेंग ४०० रुपये किलो इडलीचे सांबार महागणार
१०० उठाबशामुळे झालेल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करा ! हायकोर्ट रजिस्ट्रारचे आयुक्तांना निर्देश









