Home / महाराष्ट्र / Anmol Bishnoi Extradition : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणणार

Anmol Bishnoi Extradition : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणणार

Anmol Bishnoi Extradition : गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई याला...

By: Team Navakal
Anmol Bishnoi Extradition
Social + WhatsApp CTA

Anmol Bishnoi Extradition : गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करून भारतात परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असलेला अनमोल आज (19 नोव्हेंबर) दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) पोहोचणार आहे.

या प्रत्यार्पणावर सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असून, विमानतळावर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

हत्याकांडातील अनमोलची भूमिका बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली असून, दाखल केलेल्या आरोपपत्रात अनमोल बिश्नोईचा उल्लेख ‘मुख्य कट रचणारा’ म्हणून करण्यात आला आहे.

तपासात उघड झाले की अनमोलने परदेशात असतानाच संपूर्ण हत्येचा कट रचला. अटक केलेल्या आरोपींच्या फोनमधून जप्त केलेल्या व्हॉइस क्लिप्स अनमोलच्या आवाजाशी जुळल्या आहेत. या क्लिप्समध्ये तो साथीदारांना हत्येच्या सूचना देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्यार्पणाची माहिती आणि कायदेशीर घडामोड अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून औपचारिकरित्या हद्दपार करण्यात आले आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) या निर्णयाची माहिती बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार झीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे दिली. 18 नोव्हेंबर रोजी अनमोलला अमेरिकेच्या भूमीवरून अधिकृतपणे बाहेर काढण्यात आल्याचे या ईमेलमध्ये नमूद होते.

झीशान सिद्दीकींची प्रतिक्रिया:

“पीडित कुटुंबाचा सदस्य असल्याने मला अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणातील घडामोडींची माहिती दिली जाते. अनमोलला भारतात पाठवल्याने आम्हाला न्याय मिळेल”, असे झीशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केले.

अनमोल बिश्नोईवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्हेगारी आरोप दाखल आहेत. सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातही पोलिसांना त्याची गरज आहे.

भारतात तपास यंत्रणा सज्ज अनमोल दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्याला कोणती तपास यंत्रणा ताब्यात घेणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतीय तपास यंत्रणांकडे सोपवले जाईल, जेणेकरून या संघटित गुन्हेगारीविरोधातील तपास पुढे नेता येईल.

Web Title:
संबंधित बातम्या