Home / महाराष्ट्र / अण्णा हजारे आता तरी उठा ! पुण्यातील पाषाणमध्ये बॅनरबाजी

अण्णा हजारे आता तरी उठा ! पुण्यातील पाषाणमध्ये बॅनरबाजी

पुणे – दहा वर्षांपूर्वी भारतातील भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा (Anti-corruption movement) प्रमुख चेहरा असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (social activist Anna Hazare)हे...

By: Team Navakal
Anna Hazare Banner in Pashan, Pune

पुणे – दहा वर्षांपूर्वी भारतातील भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा (Anti-corruption movement) प्रमुख चेहरा असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (social activist Anna Hazare)हे बऱ्याच दिवसांपासून आंदोलनापासून दूर आहेत. यावरून पुण्यातील पाषाण भागात अण्णा हजारे यांना टोला लगावणारे बॅनर (banners) लावण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर (Social activist Sameer Uttarkar)यांनी ही बॅनरबाजी केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना अण्णा, तुमच्यासारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक (Gandhian activist) शांत कसा? अण्णा आता तरी उठा. कुंभकर्णही रावणासाठी (Kumbhakarna awoke)गाढ झोपेतून उठला, तसे तुम्ही आपल्या देशासाठी उठा. सरकारविरुद्ध आंदोलन छेडा (protest against the government) किंवा प्रश्न विचारा, असे आवाहन पुण्याच्या पाषाण परिसरात लावलेल्या या बॅनरवरून त्यांना करण्यात आले आहे.

यावर अण्णा हजारे म्हणाले की, मी दहा कायदे आणले पण ९० वर्षानंतर देखील मी काम करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे. अण्णांनी जे केले ते आपण करावे असे युवकांना वाटले पाहिजे. देशाचे नागरिक आहेत तर आपले काही कर्तव्य आहे की नाही. नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं अण्णांनी जाग झाले पाहिजे तेव्हा वाईट वाटते.

Web Title:
संबंधित बातम्या