Home / महाराष्ट्र / Anti-Terrorism Squad : मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई

Anti-Terrorism Squad : मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई

Anti-Terrorism Squad : दिल्ली स्फोटानंतर (Delhi blast) देशभरातल्या तपास यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS)...

By: Team Navakal
Anti-Terrorism Squad
Social + WhatsApp CTA

Anti-Terrorism Squad : दिल्ली स्फोटानंतर (Delhi blast) देशभरातल्या तपास यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra)परिसरात मोठी कारवाई केली आहे. इब्राहिम आबिदी नामक प्रोफेसरच्या घरावर छापा टाकत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एटीएस सध्या या प्रोफेसरची कसून चौकशी करत आहे.

पुणे एटीएसने (Pune ATS) कालच शहरातील कोंढवा परिसरातून अल कायदा (Al-Qaeda)इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट (एक्यूआयएस) या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून जुबेर इलियास हंगरगेकर (Hungergekar)नामक इंजिनिअर व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतूनच प्रोफेसरचे नाव समोर आले होते. त्यावरून आबिदीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या तपासात मुंब्रा येथे प्रोफेसरच्या घरीच हंगरगेकर आणि आबिदी यांची गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. हंगरगेकरच्या जुन्या मोबाईलतून ओसामा बिन लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर, ‘अल-कायदा’शी संबंधित गोपनीय कागदपत्रे, तसेच बॉम्ब बनवण्याची माहिती असलेले ‘इंस्पायर’ नावाचे मासिकही जप्त करण्यात आले आहे.

शिक्षक इब्राहिम आबिदी हा मुंब्रा येथील कौसा भागात भाड्याने राहतो. तो दर रविवारी कुर्ला येथील एका मशिदीत उर्दू शिकवण्यासाठी जात असे. त्याच भागात त्याची दुसरी पत्नी राहते. एटीएसने मुंब्रा आणि कुर्ला (Kurla) (दुसऱ्या पत्नीचे घर) या दोन्ही ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. दरम्यान, आबिदींच्या कुटुंबियांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. आबिदी हा मदरशात उर्दू शिकवत नसून गेल्या ३५ वर्षांपासून साबू सिद्दीकी महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिकाही स्पष्ट केली.

छापेमारीदरम्यान पथकाने संगणक, भ्रमणध्वनी आणि इतर संगणकीय उपकरणे जप्त केली आहेत. आबिदी मुलांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रवृत्त करत होता, असा एटीएसला संशय आहे. जप्त केलेल्या साहित्याच्या विश्लेषणावर आधारित पुढील कारवाई करण्यात येईल. पुण्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपींशी या प्रोफेसरचा थेट संबंध आहे का, याचा कसून शोध तपास यंत्रणा घेत आहेत.


हे देखील वाचा –

ट्रम्प यांची ‘लाडकी बहीण’ योजना! अमेरिकेतील नागरिकांना देणार 2,000 डॉलर

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! प्रभाग निश्चित

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये संघ गीत गाण्यावरून वाद ! चौकशीचे आदेश

Web Title:
संबंधित बातम्या