नवी मुंबईतील प्रस्तावित मंदिराला लवादाची परवानगी

harit lavada

नवी मुंबई – नवी मुंबईतील उलवे येथे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्यावतीने (TTD) उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या (Tirupati Balaji Temple)विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्त्याने दाखल केलेली याचिका राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) फेटाळून लावली असून मंदिराच्या बांधकामाला परवानगी दिली आहे.


या मंदिराच्या उभारणीमुळे (construction) किनारपट्टी नियमनाचे (सीआरझेड) उल्लंघन होणार असून परिसरातील जीवसृष्टी, कांदळवने आणि पाणथळ जमिनी नष्ट होणार आहेत,असा आक्षेप घेत मंदिराच्या उभारणीविरोधात हरित लवादासमोर याचिका (petition)दाखल करण्यात आली होती.

मात्र टीटीडीच्या वतीने शपथपत्रावर असे सांगण्यात आले की ज्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे तो भाग किनारपट्टी (Coastal Regulation Zone,)नियमनाअंतर्गत येत नाही. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच भविष्यात या ठिकाणी काही बांधकाम करायचे झाल्यास संबंधित प्राधिकरणाकडून रितसर परवानगी घेतली जाईल,असेही टीटीडीच्या वतीने लवादासमोर सांगण्यात आले. त्यामुळे लवादाने याचिका फेटाळून लावली.