Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात (Beed’s special MCOCA court.)आज १४ वी सुनावणी पार पडली. या सुनावणीत आरोपी क्रमांक २ विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने निकाल राखून ठेवत पुढील सुनावणीसाठी २४ सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.
गेल्या दोन सुनावणीला अनुपस्थित राहिलेले विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) तथा राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम (MP Ujjwal Nikam) हे आज हजर होते. सुनावणीदरम्यान आरोपी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) मालमत्ता जप्ती संदर्भातील अर्जावरही युक्तिवाद झाला. आजची सुनावणी मुख्यतः आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे (Vishnu Chate)यांच्यासह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवादासाठी होती.
अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीविनाच आरोपपत्र दाखल केले. तपास अधिकारी न्यायालयासारखे वागत आहेत असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला, की कुठल्याची प्रकारे आरोपपत्र चुकीचे नाही. तपास अधिकारी न्यायालयासारखे वागले नाहीत.
सुनावणीनंतर निकम म्हणाले, की आरोपींकडून वेळोवेळी प्रत्येक सुनावणीला वेगवेगळे अर्ज दाखल केले जात आहेत. असे करून खटल्याची सुनावणी लांबवली जात असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. आरोपी क्रमांक ३ ते ७ या सर्वांनी एकत्र दोषमुक्तीचा अर्ज केला आहे. त्यावर आज युक्तिवाद करण्यात आला.
वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे (Advocate Vikas Khade)म्हणाले, की सरकार पक्षाने संपत्ती जप्तीचा अर्ज केला आहे. त्यावर आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यावर पुढच्या सुनावणीत निर्णय दिला जाऊ शकतो. कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. त्यासाठी आता आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. सरकारी वकिलांना म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कराडच्या अर्जावर १९ सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Bombay High Court, Aurangabad bench) सुनावणी होणार आहे. गुन्हे वेगवेगळे आहेत तर त्यावर स्वतंत्र आरोपपत्र अपेक्षित होते. पण सरकारी वकिलांनी एकत्र दोषारोप पत्र दाखल केले असून हे चुकीचे आहे.
हे देखील वाचा
Asia Cup 2025: भारत आणि UAE मधील सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या
चाकाखाली लिंबू चिरडणे पडले महागात; Mahindra Thar थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली
जीएसटी कपातीमुळे Jeep च्या गाड्या स्वस्त; खरेदीवर लाखो रुपयांची बचत, जाणून घ्या नवीन किंमती