Home / महाराष्ट्र / Bhupati Surrender : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूपतीसह ६० सशस्त्र नक्षलवाद्यांची शरणागती

Bhupati Surrender : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूपतीसह ६० सशस्त्र नक्षलवाद्यांची शरणागती

Bhupati Surrender – गडचिरोलीत (Gadchiroli)नक्षलवादी संघटनेच्या पॉलिट ब्यूरोचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती (Mallojula Venugopal alias Bhupati)उर्फ सोनू याने आज...

By: Team Navakal
Bhupati Surrender

Bhupati Surrender – गडचिरोलीत (Gadchiroli)नक्षलवादी संघटनेच्या पॉलिट ब्यूरोचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती (Mallojula Venugopal alias Bhupati)उर्फ सोनू याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत त्याच्या एके-४७ रायफलसह (AK-47 rifle)सुमारे ६० नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकत . या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी संविधानाची प्रत देत सर्वांचे स्वागत करून नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्हा मागील ४० वर्षांपासून सातत्याने नक्षलवादाशी लढत आहे. सुरुवातीच्या काळात चंद्रपूर (Chandrapur), भंडारा, गोंदियाही (Gondia)नक्षलवादाने ग्रस्त होता. गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला. परंतु नक्षलवाद विरोधी गडचिरोली व सी-१६ पथकाच्या (C-16 unit,)नेतृत्वामुळे अनेक मोठ्या मोहिमा यशस्वी झाल्या. विकासकामांमुळे नवीन नक्षली भरती थांबली आणि जंगलात मोहिमा राबवून पोलिसांन नक्षलवाद्यांवर वचक बसवला. या दोन्ही उपाययोजनांमुळे नक्षलवाद चळवळीला ओहोटी लागली.


मागील १० वर्षांत पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) नेतृत्वात एक योजना आखली. त्यामध्ये प्रशासन समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचले पाहिजे. जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करतात त्यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवायचे. एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचे. किंवा पोलीस कारवाईला सामोरे जायचे.


हे देखील वाचा – 

क्रिकेट सामन्यावेळी नकार ! मात्र हाॅकीत भारत पाक खेळाडूंचे हस्तांदोलन

बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा ! इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री

चंद्रकांत पाटलांचा सल्ला घ्यावा लागेल ! रवींद्र धंगेकरांचा टोला

Web Title:
संबंधित बातम्या