Home / महाराष्ट्र / Arrest Warrants Against BJP leader : भाजप नेत्यांना कोर्टाचा झटका; भाजपच्या तीन बड्या नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी

Arrest Warrants Against BJP leader : भाजप नेत्यांना कोर्टाचा झटका; भाजपच्या तीन बड्या नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी

Arrest Warrants Against BJP leader : कोरोना कालावधीतील झालेल्या एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन नेत्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे दिसून...

By: Team Navakal
Arrest Warrants Against BJP leader 
Social + WhatsApp CTA

Arrest Warrants Against BJP leader : कोरोना कालावधीतील झालेल्या एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन नेत्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. मंत्री नितेश राणे (Nitesh rane), आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.

राज्याचे कैबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाकडून (Court) अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जून २०२१ रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात भाजपच्या या तिन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सिंधुदुर्गात राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी, न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य नेते देखील उपस्थित होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह अन्य ५ जण न्यायालयात गैरहजर होते.

मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाकडून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज देखील नाकारला आहे. त्यामुळे, या मंत्री महोदयांना कोर्टाकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे.

हे देखील वाचा – Thackeray Brother Alliance : महापालिकेच्या सिंहासनासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त चाल :६ वर्षांनंतर ब्लू सी हॉटेलमध्ये पुन्हा इतिहास; वाचा ठाकरे बंधूंच्या युती पर्यंतचा संघर्षमय प्रवास..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या