मुंबई – राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav)जय्यत तयारी सुरू झाली असून मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या (mandals)गणेशमुर्तींचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. आज काळाचौकीच्या महागणपतीसह काही गणेशमूर्तींचा आमगन सोहळा वाजतगाजत पार पडला.
१९५६ मध्ये स्थापना झालेल्या काळाचौकीच्या महागणपतीची मिरवणूक परळ वर्कशॉपपासून सुरू होऊन लालबाग मार्केटमार्गे (Lalbaug Market)काळाचौकीपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात निघाली. या वेळी शेकडो गणेशभक्त उपस्थित होते. या मिरवणुकीत शंखनाद, दहीहंडी पथकाची सलामी आणि पहिल्यांदाच महा गंगा आरती (Ganga Aarti.)करण्यात आली.
मुंबईचा मोरया (Mumbai’s Morya), कुर्ल्याचा महाराजा, फोर्टचा राजा, धारावीचा सुखकर्ता, आणि परळचा मोरया या मंडळांच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकाही आज निघाल्या. तर चिंचपोकळी येथील उदय खातू यांच्या कारखान्यातून कोल्हापूरच्या चिंतामणीचे कोल्हापूरकडे (Kolhapur)प्रस्थान झाले.