Home / महाराष्ट्र / Jain samaj :जैन बांधव नाराज होताच हालचाल !दिवाळीत आयुक्तांकडून लगेच स्थगिती

Jain samaj :जैन बांधव नाराज होताच हालचाल !दिवाळीत आयुक्तांकडून लगेच स्थगिती

Jain samaj :जैन बांधव नाराज होताच हालचाल !दिवाळीत आयुक्तांकडून लगेच स्थगिती- पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर...

By: Team Navakal
Jain

Jain samaj :जैन बांधव नाराज होताच हालचाल !दिवाळीत आयुक्तांकडून लगेच स्थगिती- पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जमीन व त्यावरील मंदिर विकण्याचा निर्णय काही विश्वस्तांनी घेतला. या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेताना मंदिरही विकल्याची माहिती लपवली, असाही आरोप आहे. या व्यवहारात भाजपाचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ गुंतले असल्याचे आरोप आहेत. या विक्रीविरोधात जैन समाज (Jain samaj ):जैन बांधव नाराज होताच हालचाल !दिवाळीत आयुक्तांकडून लगेच स्थगिती रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांची नाराजी ओढवून घ्यायला नको म्हणून ऐन दिवाळीत  धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेऊन या विक्री व्यवहाराला आज ताबडतोब स्थगिती दिली आहे.


जैन समाजाने या विक्रीत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप केला आणि रस्त्यावर उतरून विरोध केला. त्याबरोबर जैन समाजाने दोन दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आणि तत्काळ सुनावणीची मागणी केली. आज लगेच ही सुनावणी झाली. या प्रकरणात भाजपा खासदाराचे नाव आल्याने जैन समाज नाराज झाला तर पुणे पालिका निवडणुकीत भाजपाला फटका बसेल हे लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या असे म्हटले जाते. त्यामुळेच दिवाळीच्या काळातही मुंबईत धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणाची तातडीची सुनावणी घेतली आणि परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आणि जैन समाजाला मोठा दिलासा मिळाला.


 जैन याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. योगेश पांडे यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि इतर जैन बांधव उपस्थित होते. सुनावणीनंतर अ‍ॅड. योगेश पांडे म्हणाले की, भगवान महादेव दिगंबर मंदिरावर सध्या संकट आले आहे. जरी विक्रीच्या दस्तऐवजात मंदिराचे नाव नसेल, तरी ती जागा मंदिराच्या जागेत येते. आम्ही धर्मादाय आयुक्तालयात तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली होती. आजच्या सुनावणीदरम्यान मंदिराचे चित्र, फोटो आणि पुरावे सादर केले. तसेच, धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून विक्रीला परवानगी मिळवण्यात आली हे देखील समजावून सांगितले. या प्रकरणातील पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यावेळी संबंधित जागेवर मंदिर आहे की, नाही याबाबतचा अहवाल सादर केला जाईल.


ते पुढे म्हणाले की, सुनावणीवेळी  आयुक्तांनी आदेश दिले आहेत की, त्या ठिकाणी मंदिर आहे की नाही हे प्रत्यक्ष जाऊन पाहावे. ट्रस्टकडे पैसे नाहीत आणि इमारत मोडकळीस झाली असल्याचे सांगितले. आम्ही ट्रस्टने पारित केलेल्या आदेशाच्या विरोधात युक्तिवाद मांडले आहेत. कारण त्यांच्या आधीच्या सुनावणीत कुठेही मंदिराचा उल्लेख नव्हता. मंदिरात मुरलीधर मोहोळ यांचे भेटीचे फोटो आणि संबंधित दस्तऐवज उपलब्ध आहेत. अर्ज विक्री व्यवहाराचा आधीचा होता. मात्र नवीन घटनाक्रम आम्ही सादर करू. सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्या जागेवर मंदिर आहे की नाही? प्रत्यक्ष पाहिल्यास मंदिर स्पष्ट दिसते. मात्र कागदोपत्री मंदिर गायब केले आहे.


शिवाजीनगरमधील हे बोर्डिंग हाऊस 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी स्थापन केले होते. येथे श्वेतांबर आणि दिगंबर जैन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. अलीकडे या जागेचा पुनर्विकास करण्याच्या हेतूने काही विश्वस्तांनी पुढाकार घेतला. मात्र समाजातील अनेक सदस्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. नंतर ही जागा परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विक्री व्यवहारात नियम आणि कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप समाजाकडून केला जात आहे. याशिवाय, या विक्री प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असून, या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असल्याचेही आरोप झाले. मात्र मी या कंपनीतून खूप आधीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे म्हणत मोहोळ यांनी आरोप फेटाळले. तरीही मोहोळ आणि गोखले कन्सट्रक्शन यांचे संबंध असल्याची चर्चा पुण्यात सतत होत असते.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा

कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहू येथे लाक्षणिक उपोषण

उबाठाचा २५ ऑक्टोबरला मतदार यादीबाबत मेळावा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या