Ashadhi Special Trains | पंढरपूर वारीसाठी खास सोय! मध्य रेल्वे 80 आषाढी विशेष गाड्या चालवणार, वारकऱ्यांचा प्रवास सोयीस्कर

Ashadhi Special Trains

Ashadhi Special Trains | पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी (Ashadi Fair Pandharpur) दरवर्षी लाखो भाविक जमतात. या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 1 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठीएकूण 80 आषाढी विशेष गाड्या (Ashadi Special trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.

या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

नागपूर-मिरज विशेष गाड्या (4 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01205 विशेष गाडी नागपूरहून 4 आणि 5 जुलै रोजी सकाळी 08:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 वाजता मिरजला पोहोचेल. (2 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01206 विशेष गाडी मिरजहून 5 आणि 6 जुलै रोजी दुपारी 12:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:25 वाजता नागपूरला पोहोचेल. (2 सेवा)
  • थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हासोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, साळगरे आणि आरग.
  • संरचना: 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

न्यू अमरावती-पंढरपूर विशेष गाड्या (4 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01119 विशेष गाडी न्यू अमरावतीहून 2 आणि 5 जुलै रोजी दुपारी 02:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09:10 वाजता पंढरपूरला पोहोचेल. (2 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01120 विशेष गाडी पंढरपूरहून 3 आणि 6 जुलै रोजी रात्री 07:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:50 वाजता न्यू अमरावतीला पोहोचेल. (2 सेवा)
  • थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जांब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी.
  • संरचना: 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

खामगाव-पंढरपूर विशेष गाड्या (4 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01121 विशेष गाडी खामगावहून 3 आणि 6 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03:30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. (2 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01122 विशेष गाडी पंढरपूरहून 4 आणि 7 जुलै रोजी पहाटे 05:00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 07:30 वाजता खामगावला पोहोचेल. (2 सेवा)
  • थांबे: जांब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी.
  • संरचना: 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (2 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01159 अनारक्षित विशेष गाडी भुसावळहून 5 जुलै रोजी दुपारी 01:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03:30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक 01160 अनारक्षित विशेष गाडी पंढरपूरहून 6 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:00 वाजता भुसावळला पोहोचेल.
  • थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.
  • संरचना: 16 जनरल सेकंड क्लास / स्लीपर क्लास कोच आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (10 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01101 अनारक्षित विशेष गाडी लातूरहून 2, 4, 7, 8 आणि 9 जुलै रोजी सकाळी 07:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल. (5 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01102 अनारक्षित विशेष गाडी पंढरपूरहून 2, 4, 7, 8 आणि 9 जुलै रोजी दुपारी 01:50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 07:20 वाजता लातूरला पोहोचेल. (5 सेवा)
  • थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरुड (डी), ढोकी, कळंब रोड (डी), येडशी, धाराशिव (उस्मानाबाद), पांगरी, बार्शी टाउन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.
  • संरचना: 8 स्लीपर क्लास कोच, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

मिरज-कलबुर्गी अनारक्षित विशेष गाड्या (20 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01107 अनारक्षित विशेष गाडी मिरजहून 1 ते 10 जुलै दरम्यान दररोज सकाळी 05:00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 01:30 वाजता कलबुर्गीला पोहोचेल. (10 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01108 अनारक्षित विशेष गाडी कलबुर्गीहून 1 ते 10 जुलै दरम्यान दररोज दुपारी 03:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11:50 वाजता मिरजला पोहोचेल. (10 सेवा)
  • थांबे: आरग, बेळंकी, साळगरे, कवठे महांकाळ, लांगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हासोबा डोंगरगाव, जावळे, वसुद, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब (फक्त ट्रेन क्रमांक 01108 साठी), कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दोधनी आणि गंगापूर.
  • संरचना: 12 जनरल सेकंड क्लास / स्लीपर क्लास कोच आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

कोल्हापूर-कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाड्या (20 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01209 अनारक्षित विशेष गाडी कोल्हापूरहून (Kolhapur) 1 ते 10 जुलै दरम्यान दररोज सकाळी 06:10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 01:30 वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल. (10 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01210 अनारक्षित विशेष गाडी कुर्डुवाडीहून 1 ते 10 जुलै दरम्यान दररोज दुपारी 04:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:30 वाजता कोल्हापूरला पोहोचेल. (10 सेवा)
  • थांबे: हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, आरग, बेळंकी, साळगरे, कवठे महांकाळ, लांगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हासोबा डोंगरगाव, जावळे, वसुद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब.
  • संरचना: 12 जनरल सेकंड क्लास / स्लीपर क्लास कोच आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्या (16 सेवा)

  • ट्रेन क्रमांक 01207 अनारक्षित विशेष गाडी पुणे (Pune) येथून 3 ते 10 जुलै दरम्यान दररोज सकाळी 08:40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 06:45 वाजता मिरजला पोहोचेल. (8 सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01208 अनारक्षित विशेष गाडी मिरजहून 3 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 दरम्यान दररोज रात्री 07:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:30 वाजता पुण्याला पोहोचेल. (8 सेवा)
  • थांबे: हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वसुद, जावळे, म्हासोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लांगरपेठ, कवठे महांकाळ, साळगरे, बेळंकी आणि आरग.
  • संरचना: 12 जनरल सेकंड क्लास / स्लीपर क्लास कोच आणि 2 सेकंड सीटिंग व लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण आणि माहिती:

ट्रेन क्रमांक 01205, 01206, 01119, 01120, 01121 आणि 01122 साठीचे बुकिंग विशेष शुल्कांसह 16 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे UTS प्रणालीद्वारेसामान्य शुल्कांसह बुक करता येतील, जे सुपरफास्ट मेल / एक्सप्रेस ट्रेन्ससाठी लागू आहेत.