Ashish Shelar On Thackeray Brothers : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाली असून या महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे युती आणि आघाडी करण्यासाठी नेत्यांच्या दिवसरात्र बैठका सुरू आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चानी देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे युतीची लवकरच घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत कवितेच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेवर वारंवार टीका करत असल्याचे दिसून येत आहे. ‘मारली लाथ काँग्रेसने जोराची, आता उभे राष्ट्रवादीच्या (शप) दारात पसरुन पदर, म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर..’, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे, तर त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही तोडीस तोड असे प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणले आशिष शेलार?
“स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत, घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत फिरत आहेत. करुन दाखवलं’ चे गाताय जर गाणे, पॉकेट बुकमध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने? अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा, तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा.. मारली लाथ काँग्रेसने जोराची, आता उभे राष्ट्रवादीच्या (शप) दारात पसरुन पदर, म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर..यांनी काय केले..सजवली याकूब मेमनची कबर, ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम?, अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघाती वार केले आहेत.
स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 19, 2025
घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत
"करुन दाखवलं" चे गाताय जर गाणे,
पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने?
अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा
तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र
मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा
मारली लाथ…
त्यांच्या या कवितेला अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करतच प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणतात दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत, उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत…‘करून दाखवलं’ या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार, ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार..मुंबईचा पैसा उडवून तरी मुंबईकर मतांची आशा, राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई वाचवण्याची भाषा..हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर, आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर…सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते,अधून मधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचे खाज त्यांना येते…
दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत,
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 19, 2025
उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत..
'करून दाखवलं' या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार,
ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार..
मुंबईचा पैसे उडवून तरी मुंबईकर मतांची आशा,
राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई… https://t.co/G5R2BSYTSw
परंतु हा वाद इथवरच थांबलेला नाही. कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या प्रस्तावित युतीला होत असलेल्या विलंबावरून देखील एक्सवर पोस्ट करून टोला लगावला आहे. युतीची पहिली सभा कुठे होणार मुंब्रा की महंमद अली रोड यावरच चर्चेचे ‘इंजिन’ अडकल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
आशिष शेलारांनी नेमकी काय पोस्ट केली:
-मातोश्रीचे शिपाई तिळगुळ घेऊन शिवतीर्थावर जातात..’तिळा’ एवढ्या जागा देऊन ‘गुळ’ खिशातच ठेवतात
-गोड गोड बोलून “लाडक्या”भावाला भुरळ घातली जातेय.. पडणाऱ्या जागांची मोठी खिरापत वाटली जातेय
-बाकी सगळ्या जागांचे वाटप म्हणे झालंय..भेंडी बाजार, महमद अली रोड, मालवणी,बेहराम पाडा यावर सगळं अडलंय…
-दोघांनाही इथेच समान जागा हव्यात ? दोघांमध्ये यावरच चर्चेची सुरु आहेत सत्रं ? मिडियाला कळू नये म्हणून झाकून ठेवलेत सूत्रं !
-पहिली सभा कुठे याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये वाढलेय..मुंब्रा की महमद अली रोड एवढ्यावरच चर्चेचे “इंजिन” अडलेय !!
मातोश्रीचे शिपाई तिळगुळ घेऊन शिवतीर्थावर जातात..
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 20, 2025
'तिळा' एवढ्या जागा देऊन 'गुळ' खिशातच ठेवतात
गोड गोड बोलून "लाडक्या"भावाला भुरळ घातली जातेय
पडणाऱ्या जागांची मोठी खिरापत वाटली जातेय
बाकी सगळ्या जागांचे वाटप म्हणे झालंय..
भेंडी बाजार, महमद अली रोड, मालवणी,बेहराम पाडा यावर सगळं…
अश्या शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू या सगळ्या प्रश्नांना कसे उत्तर देणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – Nagarparishad Election 2025 : राज्याच्या या भागात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; मशीन बिघडल्याने एकच गोंधळ









