Home / महाराष्ट्र / Ashok Kharat : भोंदू खरातच्या लेकीची संपत्ती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! वाचा भोंदू खरातची कोट्यावधींची उलाढाल

Ashok Kharat : भोंदू खरातच्या लेकीची संपत्ती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! वाचा भोंदू खरातची कोट्यावधींची उलाढाल

Ashok Kharat : संपूर्ण जिल्ह्याच्या सामाजिक आणि धार्मिक भावनेला तडा देणाऱ्या भोंदूगिरी आणि अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात...

By: Team Navakal
Ashok Kharat
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat : संपूर्ण जिल्ह्याच्या सामाजिक आणि धार्मिक भावनेला तडा देणाऱ्या भोंदूगिरी आणि अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपुष्टात आली. या पार्श्वभूमीवर, त्याला कडक पोलीस बंदोबस्तात आज, १ एप्रिल २०२६ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासाची सद्यस्थिती आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, माननीय न्यायाधीश श्रीमती बी. एन. ईचपुरानी यांनी आरोपी अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Magisterial Custody) सुनावण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

अशोक खरातच्या राजकीय संबंधांचा पर्दाफाश; मुलीच्या विवाहपत्रिकेवरील बड्या नेत्यांची नावे आणि अफाट मालमत्तेचे गुपित उघड-
नाशिकमधील विकृत भोंदूगिरी आणि शोषणाच्या प्रकरणातील संशयित अशोक खरात याच्या अटकेनंतर आता त्याच्या कुटुंबीयांच्या संशयास्पद हालचाली आणि राजकीय संबंधांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. विशेषतः खरातची मुलगी, तिच्या विवाहपत्रिकेचा मुद्दा सध्या अत्यंत संवेदनशील ठरला असून, त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांसारख्या अतिवजनदार व्यक्तींची नावे ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून छापण्यात आली होती. सोशल मीडियावर या विवाहपत्रिकेचे छायाचित्र वेगाने प्रसारित झाल्याने, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील दिग्गज नेत्यांचे या तथाकथित ‘ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञा’शी नेमके काय संबंध होते, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याचबरोबर नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्तेबाबत नवनवे खुलासे होत असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावरही मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे उघड होत आहे.

मुलीच्या नावे मॉडेल कॉलनीत कोट्यवधींचा आलिशान फ्लॅट, रोख व्यवहाराचा संशय-
नाशिकमधील भोंदूगिरी आणि अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे आता राज्याची विद्यानगरी असलेल्या पुण्यापर्यंत पसरल्याचे उघड झाले आहे. पुण्याच्या अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनी परिसरातील एका आलिशान इमारतीत खरातने आपल्या मुलीच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मॉडेल कॉलनीतील ‘२४ रत्नम’ या प्रतिष्ठित गृहसंकुलाच्या सातव्या मजल्यावर सुमारे १०५५ चौरस फुटांचा ‘३ बीएचके’ (3 BHK) फ्लॅट खरात कुटुंबाच्या मालकीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १३ सप्टेंबर २०२३ रोजी या सदनिकेची नोंदणी करण्यात आली असून, या मालमत्तेच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या मालमत्ता व्यवहारातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, १ कोटी २० लाख रुपयांची प्रचंड रक्कम रोख स्वरूपात (Cash) देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सामान्यतः अशा मोठ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकतेसाठी बँकिंग प्रणालीचा वापर केला जातो; मात्र, खरातने या व्यवहारात कायद्याला बगल दिल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, या सदनिकेच्या अधिकृत ‘खरेदी खतामध्ये’ (Sale Deed) कोणत्याही प्रकारच्या धनादेशाद्वारे (Cheque) किंवा ऑनलाइन पद्धतीने व्यवहार झाल्याचा उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. केवळ रोख रकमेच्या जोरावर झालेला हा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, उत्पन्नाचे स्रोत लपवण्यासाठीच हा मार्ग अवलंबल्याचा संशय बळावला आहे.

अशोक खरातच्या अफाट मालमत्तेचे गूढ; पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पत्नीच्या नावे १८ रो-हाऊस, अल्प उत्पन्न दाखवून शेकडो कोटींची माया जमवल्याचा संशय-
खरातचा विश्वासू सनदी लेखापाल (CA) पोफळे याच्या माध्यमातून पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठीत आणि महागड्या समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात तब्बल ४९ गुंठे जमिनीवर १८ आलिशान ‘रो-हाऊस’ बांधण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांची ही सर्व स्थावर मालमत्ता खरातने स्वतःच्या नावावर न ठेवता आपल्या पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. उच्चभ्रू वस्तीतील या मालमत्तेचे बाजारमूल्य प्रचंड असून, अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या काळबहेरीचा हा एक मोठा पुरावा मानला जात आहे.

आर्थिक व्यवहारांमधील विसंगती पाहता, अशोक खरात हा आयकर विभागाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये आपले वार्षिक उत्पन्न केवळ १२ लाख रुपये असल्याचे भासवत होता. मात्र, प्रत्यक्षात त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेचा विचार करता, त्याची एकूण संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे. १२ लाखांचे अधिकृत उत्पन्न दाखवणारी व्यक्ती पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार कशी करू शकते, यावरून खरातने मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ पुणेच नव्हे, तर राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही खरातने बेनामी पद्धतीने जमिनी आणि व्यावसायिक संकुले खरेदी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्या दिशेने आता तपास चक्राकार फिरू लागला आहे.

अशोक खरातने स्वतःभोवती निर्माण केलेले ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि ‘अंकशास्त्रज्ञ’ हे वलय केवळ आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक साधन असल्याचे आता सिद्ध होत आहे. मर्चंट नेव्हीतील निवृत्तीनंतर अल्पावधीतच त्याने जमवलेली ही अफाट माया ही प्रामुख्याने लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आणि राजकीय संबंधांचा वापर करून जमवल्याचा आरोप होत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या