Home / महाराष्ट्र / Ashok Kharat Case : अशोक खरातच्या ‘फोकस प्रॉपर्टी’ कार्यालयात एसआयटीचा छापा; तपासात खळबळजनक खुलासे आणि नराधमाचा अजब दावा

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या ‘फोकस प्रॉपर्टी’ कार्यालयात एसआयटीचा छापा; तपासात खळबळजनक खुलासे आणि नराधमाचा अजब दावा

Ashok Kharat Case : महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणातील तपासाला आता अधिक गती प्राप्त झाली आहे. न्यायालयाने आरोपी...

By: Team Navakal
Ashok Kharat Case
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Case : महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणातील तपासाला आता अधिक गती प्राप्त झाली आहे. न्यायालयाने आरोपी खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, विशेष तपास पथकाकडून (SIT) त्याची कसून चौकशी केली जात आहे. आज तपासाचा एक भाग म्हणून एसआयटीचे पथक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (Forensic) तज्ज्ञ नाशिकमधील त्याच्या ‘फोकस प्रॉपर्टी’ या कार्यालयात दाखल झाले. यावेळी काही फिर्यादी महिलांच्या उपस्थितीत या कार्यालयाची सखोल झडती घेण्यात आली.

अध्यात्म आणि राष्ट्रवादाचा बनावट बुरखा-
तपास पथकाने खरातच्या कार्यालयातील त्या विशिष्ट केबिनची पाहणी केली, जिथे तो महिलांवर अत्याचार करत असे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी तो केबिनमध्ये महिलांचे शोषण करत असे, त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांना बाहेरच्या दालनात बसवून ठेवले जाई. या दालनाच्या भिंतीवर भारताचा राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ लावण्यात आला होता, जेणेकरून आपल्यावर कोणाचाही संशय येऊ नये. केबिनच्या आत मात्र अत्यंत सूक्ष्म नियोजित ‘फोकस लाईट्स’ आणि भिंतीवर ‘ओम’ हे चिन्ह कोरलेले आढळले. या माध्यमातून स्वतः आध्यात्मिक असल्याचे भासवून तो भक्तांवर आपला प्रभाव टाकत असे. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण परिसराचे चित्रीकरण केले असून अनेक महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.

अशोक खरातचा अजब दावा: “विधीचाच एक भाग”-
पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातने तपासादरम्यान स्वतःचा बचाव करण्यासाठी अत्यंत अजब आणि संतापजनक दावे केले आहेत. “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले,” असे म्हणत त्याने पीडितांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, महिलांसोबत केलेले गैरकृत्य हा ‘विधीचाच’ एक भाग असल्याचा खळबळजनक दावा त्याने केला आहे. “मी कोणावरही जबरदस्ती केली नाही, आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकणार,” अशी मुक्ताफळे त्याने चौकशीत उधळली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीत असतानाही त्याचे मंत्रपठण आणि ढोंग सुरूच आहे.

उद्योजकांची कोट्यवधींची लूट आणि परदेशवाऱ्या-
केवळ महिलांचे लैंगिक शोषणच नव्हे, तर अनेक बड्या उद्योजकांना भिकेला लावण्याचे पापही खरातने केले आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद हे त्याचे प्रमुख शिकार ठरले. ज्योतिषशास्त्रीय सल्ल्यासाठी खरातच्या संपर्कात आलेल्या जासूद यांना त्याने मृत्यूचे भय दाखवले आणि ‘अवतार पूजे’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना लुटले. त्यांच्याकडून महागडी ‘मर्सिडीज’ गाडी उकळली आणि त्यांच्याच खर्चाने २१ देशांची सहल केली. इतकेच नव्हे, तर अमेरिकेत स्वतःवर उपचार करून घेणे, मिरगाव येथील फार्महाऊस बांधणे आणि तिथल्या फर्निचरचा खर्चही जासूद यांच्याकडूनच करून घेतल्याचे उघड झाले आहे.

शस्त्र परवाना आणि काडतुसांचे गूढ-
अशोक खरातकडे असलेल्या शस्त्रांबाबतही आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला २०१२ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाना मिळाला होता आणि जानेवारी २०२४ मध्ये त्याचे नूतनीकरणही करण्यात आले होते. तपासादरम्यान त्याच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यातील ५ काडतुसे वापरलेली आढळली आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या