Home / महाराष्ट्र / Ashok Kharat Case Nashik : वरिष्ठ पोलीस अधिकारी रडारवर; लैंगिक शोषण आणि हातचलाखीच्या काळ्या कारनाम्यांची खरातकडून कबुली

Ashok Kharat Case Nashik : वरिष्ठ पोलीस अधिकारी रडारवर; लैंगिक शोषण आणि हातचलाखीच्या काळ्या कारनाम्यांची खरातकडून कबुली

Ashok Kharat Case Nashik : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. विशेष तपास...

By: Team Navakal
Ashok Kharat Case Nashik
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Case Nashik : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत खरातने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर, प्रशासकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका सनदी (IAS) अधिकाऱ्यापाठोपाठ आता दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारीदेखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस अधिकारी आणि खरात यांचे साटेलोटे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पोलीस उपायुक्त (DCP) आणि एक सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) दर्जाच्या महिला अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. आपल्या आवडीच्या ठिकाणी नियुक्ती (Postings) मिळवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी खरातची मदत घेतली होती का, यादृष्टीने तपास सुरू आहे. तसेच, या संशयास्पद संपर्कामागे काही मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचीही पडताळणी एसआयटीकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे.

विज्ञानाच्या नावाखाली महिलांचे शोषण
अशोक खरातने चौकशी दरम्यान महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो ज्या क्लृप्त्या वापरायचा, त्यांना तो ‘विज्ञानाचे’ नाव देऊन दिशाभूल करायचा. लोकांनी ज्या गोष्टींना ‘चमत्कार’ किंवा ‘वशीकरण’ समजले, ती प्रत्यक्षात केवळ ‘हातचलाखी’ असल्याचे खरातने मान्य केले आहे. “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए,” असे म्हणत त्याने आपल्या काळ्या कारनाम्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यात त्याला अन्य कोणाची मदत लाभली होती का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

कुटुंबीयांची चौकशी आणि पत्नीचा शोध
अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस असून उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि त्याच्या मुलीचीही आज एसआयटीकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील मुख्य दुवा मानली जाणारी खरातची पत्नी कल्पना ही अद्याप फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. आर्थिक गैरव्यवहार आणि शोषण या दोन्ही आघाड्यांवर खरातचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पत्रकार परिषद
या प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती आणि आतापर्यंत हाती लागलेले पुरावे यांबाबत माहिती देण्यासाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज सायंकाळी स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या