Ashok Kharat News : नाशकात तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला एक अत्यंत अनपेक्षित आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण गुन्ह्याचा ‘मास्टरमाईंड’ म्हणजेच मुख्य सूत्रधार अशोक खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी आणि ऑफिसबॉय नीरज जाधव असल्याचे उघड झाले आहे.
मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश-
सुरुवातीला या प्रकरणात केवळ अशोक खरात याचेच नाव समोर आले होते; मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि तांत्रिक तपासात नीरज जाधव याची भूमिका संशयास्पद आढळली.
नाशिक खरात प्रकरण: ५८ महिलांच्या शोषणाचे षडयंत्र; तपासासाठी ‘एसआयटी’ सज्ज, तेजस्वी सातपुते यांच्याकडून कसून चौकशी
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या पाशवी कृत्यांनी नाशिक हादरले असतानाच, आता या प्रकरणात मानवतेला काळिमा फासणारे एक भीषण वास्तव समोर आले आहे. अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असले, तरी या शोषणाचे भांडवल करून तब्बल ५८ महिलांच्या अब्रूचा लिलाव करण्याचा आणि त्यांच्या असहाय्यतेचा व्यापार करण्याचा भयानक कट त्याचा ‘ऑफिसबॉय’ आणि मुख्य सूत्रधार नीरज जाधव याने रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
राज्य शासनाचा मोठा निर्णय: ‘एसआयटी’ची स्थापना
या प्रकरणाची व्याप्ती आणि पीडित महिलांची मोठी संख्या लक्षात घेता, राज्य शासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.
अशोक खरातच्या कार्यालयातून ५८ महिलांच्या शोषणाचे चित्रीकरण चोरीला; खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा भीषण कट उघड
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाच्या खुणा आता पुराव्यासह समोर येत आहेत. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व अत्याचारांचे चित्रीकरण, छायाचित्रे आणि संकलित केलेले ‘मॉर्फ’ व्हिडिओ (विकृत बदल केलेले व्हिडिओ) कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणेत जतन करून ठेवण्यात आले होते. मात्र, या पुराव्यांचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी नीरज जाधव याने एक भयानक षडयंत्र रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुराव्यांची चोरी आणि विश्वासाला तडा
डिसेंबर २०२५ मध्ये नीरज जाधव याने अशोक खरातच्या नकळत कार्यालयातील अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असलेले हे सीसीटीव्ही फुटेज चोरले. ज्यामध्ये सुमारे ५८ महिलांवरील अत्याचाराचे पुरावे होते. सुरुवातीला ज्या खरातच्या सावलीप्रमाणे नीरज वावरत होता, त्याच नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या चोरलेल्या व्हिडिओंच्या आधारे स्वतःच्या मालकाला, म्हणजेच अशोक खरातलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
पाच कोटींची खंडणी आणि पोलिसांत धाव
नीरज जाधव आणि त्याच्या काही साथीदारांनी या आक्षेपार्ह क्लिप्स सार्वजनिक करण्याची धमकी देत अशोक खरातकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, खरातने या धमकीला न जुमानता उलट चाल खेळली. त्याने स्वतःवर ओढवणारे संकट टाळण्यासाठी नीरज विरोधात ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करत सिन्नर येथील वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कायदेशीर लढाईमुळे नीरजचा खरातकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला.
पीडित महिलांच्या अब्रूचा बाजार
खरातकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या नीरजने आपला मोर्चा थेट त्या निष्पाप पीडित महिलांकडे वळवला. त्याने या महिलांच्या असहाय्यतेचा आणि अब्रूचा व्यापार मांडण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून, नीरज आणि त्याच्या टोळीने शिर्डी येथील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि काही व्हिडिओ तिला थेट व्हॉट्सअॅपवर पाठवून तिला धमकावले. आपल्याकडील चित्रफितींचा वापर करून महिलांना मानसिक जाळ्यात ओढणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, असा अमानवीय प्रकार नीरजने सुरू केला होता.
अशोक खरातच्या पाशवी कृत्यांचा बुरखा फाटला; ५८ महिलांच्या शोषणाचे गुपित उघड, ‘एसआयटी’चा धडाका सुरू
तथाकथित आध्यात्मिक गुरू आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या वासनांधतेचा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विकृत कारस्थानाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. एका धाडसी पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त झाले असून, या प्रकरणाचा तपास आता राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.
एका ‘व्हिडिओ’ने फिरवली तपासाची चक्रे-
अशोक खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी नीरज जाधव याने जेव्हा खरातच्या कार्यालयातील अत्याचाराचे ५८ व्हिडिओ चोरले, तेव्हापासून या ब्लॅकमेलिंगच्या नाट्याला सुरुवात झाली होती. सुरुवातीला खरातकडून ५ कोटींची खंडणी उकळण्याचा नीरजचा प्रयत्न फसला. त्यानंतर, नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला. एका विवाहितेने मंदिरात दर्शन घेत असताना नीरज आणि त्याच्या साथीदारांनी तिला गाठून अश्लील व्हिडिओ दाखवत तिला धमकावले. घाबरलेल्या या महिलेने जेव्हा खरातला ही हकीकत सांगितली, तेव्हा स्वतःचे पाप झाकण्यासाठी खरातने तिलाच पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तो निर्दोष ठरेल असा त्याचा कयास होता.
मेहुण्याचा खंबीर पाठिंबा आणि तक्रार-
खरातकडून आर्थिक लाभ मिळण्याची आशा मावळल्यानंतर नीरजने सिडको परिसरातील एका २८ वर्षीय विवाहितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. नीरजला वाटले होते की यामुळे कुटुंब घाबरून त्याला खंडणी देईल; मात्र हाच त्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ त्याच्यावर आणि खरातवर उलटला. त्या पीडितेच्या मेहुण्याने तिला खंबीरपणे पाठिंबा दिला आणि धीर देत तिला पोलीस ठाण्यात नेले. या पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमुळेच खरातच्या मुखवट्यामागचा खरा क्रूर चेहरा जगासमोर आला.
राजकीय आणि ग्लॅमर विश्वाचे कनेक्शन; ‘एसआयटी’ची एन्ट्री-
या प्रकरणातील आरोपींचे संबंध राज्यातील अत्यंत बड्या राजकीय नेत्यांशी, मंत्र्यांशी आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन, राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. पुणे येथील एसआरपीएफ (SRPF) बल गट क्रमांक एकच्या समादेशक आयपीएस तेजस्वी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत आहेत.
कठोर कारवाई आणि चौकशीचा धडाका-
गुरुवारी सकाळी आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आणि पुरावे ताब्यात घेतले. त्यांनी अशोक खरातची कारागृहात तब्बल दोन तास कसून चौकशी केली आहे. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नीरज जाधव याला ‘एसआयटी’ आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे.










