Home / महाराष्ट्र / Asrani Death :’शोले’चे ‘जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Asrani Death :’शोले’चे ‘जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Asrani Death– शोले चित्रपटात जेलरची भूमिका अजरामर करणारे विनोदी अभिनेते असरानी यांचे (Asrani Death)आज निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव गोवर्धन...

By: Team Navakal
asrani actor J

Asrani Death– शोले चित्रपटात जेलरची भूमिका अजरामर करणारे विनोदी अभिनेते असरानी यांचे (Asrani Death)आज निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. ते ८४ वर्षांचे होते. फुप्फुसाच्या तक्रारीमुळे त्यांच्यावर गेल्या ५ दिवसांपासून जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे. 

जयपूरमध्ये १ जानेवारी १९४१ रोजी जन्मलेल्या असरानी यांचे सुरुवातीचे शिक्षण जयपूरमधील सेंट झेवियर स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण राजस्थान कॉलेजमध्ये घेतले. त्यांनी अभिनयापूर्वी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केले होते.  १९६० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये जम बसवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. खूप संघर्षानंतर त्यांना जया भादुरी अभिनित गुड्डी चित्रपटातून संधी मिळाली. हा चित्रपट हिट झाला. सत्यकाम, बावर्ची, सीता और गीता, परिचय, नमक हराम, अभिमान, रोटी, मिली, छोटीसी बात, फकिरा, खून पसीना, खट्टा मीठा, अंदाज अपना अपना, हम, हेरा फेरी आणि मालामाल वीकली, जो जीता वही सिकंदर, गर्दीश, घरवाली बहरवाली, बडे मियाँ छोटे मियाँ, बोल बच्चन, भागम भाग, मेहबुबा आणि चुपके चुपके यांसारख्या ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. याती काही भूमिका आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या