Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी दिवाळी दिवशीच अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांत पंकज धीर, मधुमतीनंतर हा सिनेसृष्टीसाठीला बसलेला तिसरा धक्का आहे.
असरानी यांनी २० ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी यांना नेमकं झालं काय होत? त्यांच्यावर इतक्या घाईत अंत्यसंस्कार का करण्यात आले, याबद्दल असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी अधिकची माहिती दिली.
असरानीनां काही दिवसांपूर्वी अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास देखील होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. अशी माहिती बाबूभाई थीबा यांनी काही वृत्तानां दिली. चार दिवसांपूर्वीच आरोग्य निधी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत. तिथेच त्यांचे निधन झाले.” असरानी यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी साचलं होत.
२० ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास असरानी यांच निधन झालं. आणि रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्कार इतक्या घाईत का करण्यात आले यावरून देखील सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. यावर देखील असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई म्हणाले, “त्यांच्या पत्नीने मला म्हटलं की त्यांना याबद्दल कोणालाही काही सांगायचं नव्हतं.
त्यांना शांततेत अंत्यसंस्कार आणि बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे कोणालाही काहीच सांगायचं नाही.”असे देखील ते म्हणाले. असरानी यांनी अभिनेत्री मंजू बंसल यांच्याशी लग्न केलं. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केलं होतं.
हे देखील वाचा –
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताविषयी दुटप्पी धोरण?