Home / महाराष्ट्र / अथर्व सुदामेच्या रीलमुळे वाद; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर टीका

अथर्व सुदामेच्या रीलमुळे वाद; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर टीका

Atharv Sudame controversy

Atharv Sudame controversy: पुणेरी भाषेतील रील व्हिडिओजमुळे लोकप्रिय झालेला सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे (Atharva Sudame controversy) सध्या एका मोठ्या वादात सापडला आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना त्याने एका रीलमधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला होता, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.

या टीकेनंतर अथर्वने तातडीने तो व्हिडिओ डिलीट केला असून, सोशल मीडियावर जाहीर माफीही मागितली आहे.

Atharv Sudame controversy: नेमका वाद काय?

अथर्व सुदामेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका मूर्तीकाराच्या दुकानात जातो. मूर्तीकार मुस्लिम असल्याचे लक्षात आल्यावर तो दुसऱ्या दुकानात जाण्याचा विचार करतो. मात्र, मूर्तीकाराचे मोठे मन पाहून तो त्याच व्यक्तीकडून मूर्ती घेण्याचा निर्णय घेतो.

हा व्हिडिओ ‘मूर्ती एक, भाव अनंत’ या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओच्या शेवटी, अथर्व एका संवादातून ऐक्याचा संदेश देतो, पण याच संवादावर अनेक युजर्सनी आक्षेप घेतला. यामुळे त्याला ऑनलाइन धमक्या आणि शिवीगाळही करण्यात आली.

ब्राह्मण महासंघाचा संताप

अथर्वच्या या व्हिडिओवर ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी जोरदार टीका केली आहे. दवे यांनी अथर्वला “तुझा अभ्यास नसलेल्या विषयात पडू नकोस,” असा सल्ला दिला. “तू फक्त लोकांचे मनोरंजन कर आणि तेवढ्यापुरता तुझा धंदा मर्यादित ठेव,” असे ते म्हणाले.

याशिवाय, त्यांनी हिंदूंनी गेल्या 700-800 वर्षांपासून अनेक गोष्टी भोगल्या आहेत, त्यामुळे धार्मिक ऐक्य शिकवण्याची गरज नाही, असेही स्पष्ट केले.

असिम सरोदे अथर्वच्या बाजूने

या वादात अनेक लोक अथर्वच्या बाजूने उभे राहिले आहेत. प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांनी अथर्वची बाजू घेतली. अथर्वने घाबरून व्हिडिओ हटवणे योग्य नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे हल्ले ठामपणे परतवून लावले पाहिजेत,” असे सांगत त्यांनी अथर्वला तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे आवाहन केले.


हे देखील वाचा-

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा

मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला

सिंहगडावर बेपत्ता तरुण पाच दिवसांनी सापडला