Home / महाराष्ट्र / Prithviraj Chavan : एपस्टिन ई-मेलमध्ये उल्लेख ! मोदी ऑन बोर्ड ! पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan : एपस्टिन ई-मेलमध्ये उल्लेख ! मोदी ऑन बोर्ड ! पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan – अमेरिकेतील जेफ्री एपस्टिनच्या फाईल्स काल उघड झाल्याने जगभरात भूकंप होत आहे. या फाईल्समधील सर्व कागदपत्रे किंवा डिजिटल...

By: Team Navakal
Mentioned in Epstein e-mail Modi on board!
Social + WhatsApp CTA

Prithviraj Chavan – अमेरिकेतील जेफ्री एपस्टिनच्या फाईल्स काल उघड झाल्याने जगभरात भूकंप होत आहे. या फाईल्समधील सर्व कागदपत्रे किंवा डिजिटल डाटा अजून पूर्णपणे उघड झालेला नाही. मात्र काल जी माहिती उघड झाली त्यात एपस्टिनने  ‘मोदी ऑन बोर्ड’ असे  डोनाल्ड ट्रम्प यांचे तत्कालीन सल्लागार स्टीव्ह बॅनन यांना पाठवलेल्या मेल मध्ये म्हटले आहे असे आज पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे भारतात खळबळ उडाली असून, भाजपात पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात संताप पसरला आहे.


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी अमेरिकेतील आणि इंग्लंडमधील वर्तमानपत्र रोज पाहतो. त्यातून होणार्‍या चर्चेतून अमेरिकेत एपस्टिन फाईल प्रकरण गाजत असल्याचे समजले. त्याची आपल्याकडे कुणाला माहिती नव्हती. म्हणून मी 1 डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना सवाल विचारला होता की, एपस्टिन कागदपत्रे व माहिती खुली झाल्यानंतर भारताच्या राजकारणावर परिणाम होईल का? कारण परिणाम होईल असे मला वाटत होते. त्यावेळेला स्पष्ट पुरावा नसल्यामुळे मी कोणाची नावे घेतली नव्हती. पण आज पहिल्यांदा काही नावे घेतली. कारण त्यासंदर्भात पुरावे आलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बेनेन यांना जेफ्री एपस्टिन सतत सांगत होता की तू एकदा पंतप्रधान मोदी यांना भेट. शेवटी बेनन भेट घेण्यास राजी झाला. यावर एपस्टिनने, तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो. असे उत्तर दिले.

धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतर काही दिवसांनी एपस्टिनने बॅनन यांना पुन्हा मेल करून मोदी ऑन बोर्ड   असे कळवले. जेफ्री एपस्टिन हा बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता. अशा व्यक्तीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नक्की नाते काय? तो भारताच्या पंतप्रधानांची अपॉइंटमेंट कशी काय ठरवू शकतो? या प्रश्नांची उत्तरे सरकारने जनतेला दिली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की नरेंद्र मोदींशिवाय या फाईल्समध्ये  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भाजपाचे हरदीप सिंग पुरी यांचे नाव एका ई-मेलमध्ये आढळले आहे. पुरी हे मंत्री होण्यापूर्वी अमेरिकेतील भारताचे राजदूत होते . एक माजी खासदार आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव या कागदपत्रांमध्ये आहे. याशिवाय अमेरिकेत राहणार्‍या आरोग्य संबंधित मोठ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचेही आहे. या खुलाशांनंतर संबंधित लोक त्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, ते मॉर्फ केलेले आहेत किंवा व्हिडिओ चित्रण बदलेले आहे अशी कारणे सांगतील. शेवटी जेव्हा ते सर्व जनतेच्या न्यायालयात खुले होईल तेव्हा आपण अशा व्यक्तींच्या हाती सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची की नाही याचा जनतेला विचार करावा लागेल.  या फाईल्समध्ये 30 वर्षांची कागदपत्र आणि डिजिटल डाटा आहे ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ व ऑडीओ रेकॉर्डिंग असा 300 जीबी डाटा आहे. याबाबत अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी अजून पूर्ण माहिती मिळाली नसल्याचे म्हटले आहे . त्यामुळे येणार्‍या काळात आणखी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.


दरम्यान, अल्पवयीन मुलींचा गैरवापर करीत  त्यातून राजकीय व व्यावसायिक दबावाचे षडयंत्र याचा खुलासा ज्या एपस्टिन फाईलमधून  होणार होता त्यातील काही फाईल काल प्रसिद्ध झाल्या. मात्र अनेक महत्त्वाच्या फाईल लपवून ठेवण्यात आल्या आहेत. न्यायालयाने सर्व फाईल उघड करण्यास सांगितल्यानंतरही अनेक फाईल उघड न केल्याने अमेरिकेचे नागरिक हे अमेरिकेच्या जस्टीस विभागावर संतापले आहेत. नागरिकांचा आरोप आहे की काल ज्या फाईल व फोटो प्रसिद्ध करण्यात आले त्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संबंधित कागदपत्रांची संख्या अगदी कमी होती. याउलट माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांच्यावरच सर्व भर दिल्यासारखे वाटत होते. त्यांचेच फोटो खूप होते. शिवाय काही कागदपत्रे अशी होती ज्यावर बराच मजकूर काळी शाई लावून लपवला होता. न्यायालयाने सर्व कागदपत्रे उघड करायला सांगितले असताना निवडक फाईलच का उघड केल्या याचे उत्तर आम्हाला हवे आहे असे नागरिक म्हणत आहेत. ज्या एपस्टिन फाईल उघड झाल्या आहेत त्या डाऊनलोड करून त्याचा अभ्यास देशभरात सुरू आहे. येत्या काळात विविध नेत्यांबद्दल आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

सोनू सूद, युवराज सिंगसह अनेक सेलिब्रिटींना ईडीचा दणका! कोट्यवधींची मालमत्ता जप्त; काय आहे प्रकरण?

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या