Mumbai-Agra Highway Movement- नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Mumbai-Agra Highway Movement) करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मालेगावच्या ग्रामस्थांनी आज मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला होता. यावेळी आंदोलकांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली. या आंदोलनात मंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसे यांच्यासह काही स्थानिक नेतेही सहभागी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला फाशी न दिल्यास पुढील आठ दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांसह आविष्कार भुसे यांना ताब्यात घेतले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. यापूर्वीही या घटनेच्या निषेधार्थ अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. न्याय न मिळाल्यास पुढील आठवडाभर तीव्र आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी पुन्हा दिला.
या प्रकरणातील आरोपीची आज न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली . येवेला मालेगाव न्यायालयाने आरोपीला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आरोपीला कोणी मदत केली का, त्याचे कोण साथीदार आहेत का, इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
———————————————————————————————————————————————-
हे देखील वाचा-
पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार









