Home / महाराष्ट्र / Leopard Siren : जुन्नरमध्ये बिबट्या दिसताच आपोआप वाजणार सायरन

Leopard Siren : जुन्नरमध्ये बिबट्या दिसताच आपोआप वाजणार सायरन

Leopard Siren – जुन्नर (Junnar)आणि आंबेगाव तालुक्यात श्रीविघ्नहर व भीमाशंकर सहकारी (Bhimashankar cooperative) कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. या...

By: Team Navakal
Leopard Siren

Leopard Siren – जुन्नर (Junnar)आणि आंबेगाव तालुक्यात श्रीविघ्नहर व भीमाशंकर सहकारी (Bhimashankar cooperative) कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांचे बिबट्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून वन विभागाने आधुनिक उपाययोजना आखली आहे. परिसरात कुठेही बिबट्या दिसताच आपोआप सायरन वाजणार आहे. या संदर्भातील एक ॲप (Mobile app)विकसित करण्याचे काम सुरू असून ते परिसरातील ग्रामस्थांना उपलब्ध केले जाणार आहे.

या भागात बीड (Beed), धाराशिवसह विविध भागातून हजारो ऊसतोडणी मजूर येत आहेत. काही महिन्यांतील वाढते हल्ले पाहता यंदाच्या हंगामात बिबट्यांच्या उपद्रवात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजुरांनी अत्यंत सावधानता बाळगणे गरजेचे आहे. ऊस शेती हे बिबट्याचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. या हंगामात बिबट्याची पिल्लेही सापडत असल्याने हल्ले वाढतात. मजूर भल्या पहाटे कामावर निघत असल्याने धोका अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर, बिबट्याला रोखण्यासाठी वन विभागाने अत्याधुनिक एआय प्रणाली विकसित केली आहे. जुन्नर वन विभागातील (Forest Department) ५० बिबट प्रवण क्षेत्रांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरनेट आणि सायरनचा समावेश आहे. या प्रणालीमुळे बिबट्या आल्यास तातडीने त्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी जुन्नर तालुक्यात २१ ठिकाणी ही यंत्रणा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, या संदर्भातील एक ॲप विकसित करण्याचे काम सुरू असून ते परिसरातील ग्रामस्थांना उपलब्ध केले जाणार आहे.


हे देखील वाचा – 

पश्चिम रेल्वेवर रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक

तालिबानशी झालेल्या अयशस्वी चर्चेसाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले

संजय राऊतांना गंभीर आजाराची लागण; दोन महिने सार्वजनिक जीवनाला ब्रेक

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या