Badlapur News : कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलावर डांबरीकरणाचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक ३ ते २३ नोव्हेंबरपर्यंत सगळ्या प्रकारच्या वाहनासाठी बंद राहणार आहे. वाहतूक पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात पुलावरील वाहतूक बंदची अधिसूचना काढली आहे, या संदर्भातील अधिक माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी दिली आहे.
ही वाहने बदलापूर रोडने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, तसेच मलंग रोड, लोढा, पलावा, शीळ, आणि डायघर रोड पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येउ शकतात. मुरबाडकडून शहाडपुलावरुन कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मात्र दहागावा फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
कल्याण शहरात येणासाठी ही वाहने दहा गाव फाटे मार्गे वाहोली, एरंजाड, बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढा, पलावा, शीळ, डायघर रोड, पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करू शकतात.
कल्याणकडून मुरबाडकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुर्गाडी येथे प्रवेश बंद केला आहे. दरम्यान बदलापुरला जाताना नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असलयाचे चित्र आहे. कटाई रोड ते बदलापूर मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अधिक वाहतूक जास्त असते आणि आता वाहतूक कोंडी दुप्पट होणार असल्याचे दिसत आहे.
हे देखील वाचा –









