Statue of Balasaheb Thackeray- मुंबईतील फोर्ट परिसरात रिगल सिनेमाजवळ असलेल्या शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Statue of Balasaheb Thackeray) यांच्या पुतळ्याला हिरव्या कापडाने पूर्णपणे झाकण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुतळ्याची साफसफाई व डागडुजी सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ऐन निवडणुकीच्या काळात आणि बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वी हा पुतळा झाकण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील हा एकमेव पुतळा असून, 23 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा पूर्णपणे झाकल्याने श्रेयवाद आणि राजकीय हेतूंच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत वॉर्ड कार्यालय किंवा मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यावरुन उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनात बाळासाहेबांची भीती बसली आहे. बाळासाहेब ठाकरे हे आता कोणत्याही एका पक्षाचे नेते राहिलेले नाहीत, तर राष्ट्रपुरुष आहेत. मग गांधीजींचा किंवा अटल बिहारी वाजपेयींचा पुतळा झाकला जातो का? मग फक्त बाळासाहेबांचाच पुतळा का झाकण्यात आला?
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा
संकष्टी चतुर्थीचा सोनेरी योग; अंगारकी संकष्टी चतुर्थी: उपवास, पूजा आणि आशीर्वादांचा शक्तीशाली संगम..
उत्तर प्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल? योगी–मोदी भेट महत्त्वाची
फेसबुक लाईव्हवर दिसला अपघाताचा थरार; रील्सस्टार तरुणाचा अपघाती मृत्यू..









