Home / महाराष्ट्र / Baramati News : बारामतीचा ‘किंग’ कोण? पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या हालचालींनी सस्पेन्स वाढला; पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या सक्रियतेमुळे २०२९ च्या संघर्षाची नांदी..

Baramati News : बारामतीचा ‘किंग’ कोण? पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या हालचालींनी सस्पेन्स वाढला; पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या सक्रियतेमुळे २०२९ च्या संघर्षाची नांदी..

Baramati News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाच्या राजकीय वारसाहक्कावरून चर्चांना उधाण आले आहे. २०२९...

By: Team Navakal
Baramati News
Social + WhatsApp CTA

Baramati News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाच्या राजकीय वारसाहक्कावरून चर्चांना उधाण आले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून होत असल्याचे वरवर दिसत असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळेच संकेत देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता कुटुंबातील तिसरी पिढी आमनेसामने उभी ठाकल्याचे चित्र बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे.

युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार: प्रचाराचा धडाका-
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते युगेंद्र पवार यांनी सध्या बारामतीचा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ते दररोज विविध गावांचे दौरे करून स्थानिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. “जे लोक जनतेचे प्रश्न सोडवतील, त्यांनाच बारामतीकर साथ देतील,” असे विधान करत युगेंद्र पवारांनी २०२९ च्या रणधुमाळीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही मतदारसंघात आपली सक्रियता कमालीची वाढवली आहे. जनतेचे सुख-दुःख जाणून घेणे, अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करणे आणि जनता दरबार भरवून प्रशासकीय कामांना गती देणे, यावर त्यांचा भर आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी असल्याचे जय पवार यांनी सूचित केले आहे. या दोन युवा नेत्यांच्या सक्रियतेमुळे बारामतीचा राजकीय पारा चढला आहे.

सुप्रिया सुळे यांची भूमिका आणि रोहित पवारांची असहमती-
खासदार सुप्रिया सुळे यांनी काही काळापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात “भविष्यात किमान माझ्याकडून तरी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार नाही,” अशी भावनिक भूमिका मांडली होती. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या भूमिकेशी अप्रत्यक्ष असहमती दर्शवली आहे. सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य भावनिक असू शकते, परंतु राजकारणात परिस्थिती वेगाने बदलते, असे रोहित पवार म्हणाले. जोपर्यंत अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये आहे, तोपर्यंत राजकीय विरोध कायम राहील, असे स्पष्ट करत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला छेद दिला आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार यांचीही बारामतीमध्ये सुप्त इच्छा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कुटुंब विरुद्ध राजकारण: बारामतीकरांची उत्सुकता-
पवार कुटुंब सामाजिक स्तरावर एकत्र असल्याचे भासवत असले, तरी राजकीय विचारधारा आणि सत्तेच्या समीकरणांमुळे निर्माण झालेली दरी वाढत चालली आहे. एका बाजूला शरद पवारांचा वारसा सांगणारे युगेंद्र पवार आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांची legacy पुढे नेणारे जय पवार यांच्यातील हा संघर्ष केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या