Home / महाराष्ट्र / Adani : बारामतीत अदानींवर पवारांची स्तुतिसुमने! पायघड्या!अदानी माझे मोठे बंधू! अदानी अपार कष्टाळू

Adani : बारामतीत अदानींवर पवारांची स्तुतिसुमने! पायघड्या!अदानी माझे मोठे बंधू! अदानी अपार कष्टाळू

Adani : अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी व पत्नी प्रीती यांचे आज पवारांच्या बारामतीत (Adani) आगमन झाले तेव्हा संपूर्ण...

By: Team Navakal
adani
Social + WhatsApp CTA

 Adani : अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी व पत्नी प्रीती यांचे आज पवारांच्या बारामतीत (Adani) आगमन झाले तेव्हा संपूर्ण पवार कुटुंबाने उपस्थित राहून त्यांच्यापुढे पायघड्या घातल्या! अजित पवार यांनी त्यांची वारेमाप स्तुती करीत त्यांनी खूप कष्ट केल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे तर त्यांना माहिती देताना अगदी लगबग करताना दिसल्या. इतकेच नव्हे तर अदानी हे माझे बंधू असून सुखात किंवा दुःखाच्यावेळी मी प्रथम त्यांच्याशीच बोलते असे जाहीर भाषणात सांगून आपले किती निकटचे नाते आहे हे जाहीर केले. रोहित पवारांनी अदानींच्या मोटारीचे सारथ्य केले.  पंतप्रधान मोदी यांच्या प्रमाणेच अदानी यांनीही शरद पवार हे माझे गुरू आहेत, त्यांच्याकडून मी गेली 30 वर्षे मार्गदर्शन घेत आहे असे सांगितले. यामुळे भाजपाच्या या लाडक्या उद्योगपतीचे पवार कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत हे सिद्ध झाले. राजकीय तणावामुळे दिवाळी कार्यक्रम आणि घरातील लग्न सोहळ्यातही एकत्र न आलेले पवार कुटुंब अदानी यांच्या स्वागताला एकत्र होते. कार्यक्रमानंतर गोविंदबाग या निवासस्थानी भोजन सोहळाही पार पडला. यानंतर राजकारणात जनता पुन्हा अडाणी ठरते का हे पाहायचे आहे.
आज बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन झाले. यावेळी शरद पवार हे आपले मार्गदर्शक असल्याचे अदानी यांनी स्तुतिसुमने  उधळली तर सुप्रिया सुळे यांनी अदानी आपले ज्येष्ठ बंधू असल्याचा उल्लेख केला. अजित पवार यांनी अदानी यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाढा वाचला व बारामती ग्रामीण विद्येचे माहेरघर होईल असे सांगितले.


आ. रोहित पवार बनले सारथी
त्याआधी आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्घाटनासाठी उद्योगपती गौतम अदानी यांचे सपत्नीक आगमन झाले. यावेळी त्यांचे पवार कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर अदानी यांच्या कारचे सारथ्य आ. रोहित पवार यांनी केले. अदानी हे कारकडे निघाले तेव्हा रोहित पवार कार चालवत होते तर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते. हे सर्वजण मग विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झाले. तिथे अदानी यांच्या स्वागताला पूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
अदानी यांच्या हस्ते आज बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वास्तूचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांची पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, विद्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष युगेंद्र पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना अदानी यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांची तोंडभरून प्रशंसा करत ते आपले मार्गदर्शक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जगात काही स्थानं अशी असतात जी प्रगती व परिवर्तनाची प्रतीक बनतात. बारामती हे असे प्रतीक आहे. माझे गुरू शरद पवार यांच्या अतुलनीय दृष्टीमुळे हे शक्य आहे. मी गेली 30 वर्षे त्यांना ओळखतो, त्यांच्याकडून जे ज्ञान मिळाले ते अतुलनीय आहे. ज्ञानाबरोबर त्यांचे प्रेम, आपुलकी हे स्मरणात राहते. भारताने कोणत्या दिशेने जावे त्याचा बारामती हा आरसा आहे. चांगले राजकारण म्हणजे एकाचा विजय हे नसते तर सर्वांना बरोबर घेऊन प्रगती केली तर देश मोठा होतो.
दरम्यान अदानी यांचे भाषण सुरू असतानाच अजित पवार हे त्यांच्या रिकाम्या खुर्चीत जाऊन शरद पवार यांच्या शेजारी बसले आणि दोघांमध्ये पाच सेकंद चर्चा झाली आणि काही क्षणात अजित पवार आपल्या मूळ जागेवर जाऊन बसले. हाच धागा पकडून दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचा अंदाज बांधण्यात येत होता.


अजित पवार यांनीही आपल्या भाषणात अदानी यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाढा वाचला. ते म्हणाले की, अदानी हे नेहमी बारामतीत येत असतात. त्यांचे आजही स्वागत आहे. राजकारणात मोठ्या माणसांवर  टीका होत असते, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपले व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने ही सुरुवात 1990 मध्ये झाली तेव्हा इथे कोण येणार असे म्हटले जायचे. आज देश-विदेशातून मुले इथे शिक्षणासाठी येत आहेत. येथे 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. डोनेशन न घेणारी ही राज्यातील एकमेव शिक्षण संस्था आहे. अदानी यांनीही अशीच 1989 साली शून्यातून सुरुवात केली. त्यांची जिद्द आणि व्हिजन यामुळे ते आज 20 देशांत विविध प्रकल्पांतून काम करत आहेत. त्यांची प्रशंसा करत नाही तर खरे सांगतो, आज कांदिवली आणि गुजरातेत त्यांची प्रत्येकी 5 हजार कोटींची हॉस्पिटल आहेत आणि दिल्लीत तिसर्‍या हॉस्पिटलसाठी जागा बघणे सुरू आहे. या हॉस्पिटलमध्ये 1000 हजार बेड आहेत.  त्यापैकी 500 बेड ज्यांना तेथील बिल परवडतील अशांसाठी तर 500 बेड गोरगरिबांना मोफत उपचारांसाठी आहेत. याशिवाय विमानतळ, बंदर, कोळसा खाणी, वीज उत्पादन अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी भरारी घेतली आहे. त्यांचा सीएसआर फंड यावर्षी 1 हजार कोटी इतका असून, पुढील 2 वर्षांत तो 3 हजार कोटीइतका होईल.


अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीच्या वैभवात भर घालण्यासाठी जी गोष्ट करायची ती चांगलीच करायची हा आमचा हेतू आहे. आम्ही जे करतो त्याचा बारामतीकरांना फायदा झाला पाहिजे, असा दृष्टीकोन असतो. आताही पवारसाहेबांनी काळाची गरज ओळखून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण सुरू केले. याचा ग्रामीण भागातील मुलांना फायदा होईल. येणार्‍या काळात बारामती हे ग्रामीण शिक्षणाचे माहेरघर होईल. बारामतीसाठी मी नर्सिंग होम मंजूर केले आहे. कर्करोग रुग्णालय उभारणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली. हा संपूर्ण कार्यक्रम पाहून महाराष्ट्रातील जनतेला राजकारण समजेनासे झाले आहे.

अदानींच्या भावाने पवारांचा पक्ष फोडला
संजय राऊतांचा दावा

आज बारामतीत अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आरोप केला की, उबाठा खासदार संजय राऊत यांनी गौतम अदानींच्या भावामुळे शरद पवारांचा पक्ष फुटला.


संजय राऊत म्हणाले की, मुंबईवर भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राने ज्या पद्धतीने ताबा मिळवला त्याला आमचा तात्त्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानींसारख्या उद्योगपतींना मुंबई गिळण्यासाठी दिलेले उत्तेजन हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी घातक आहे. अदानींसारखा हव्यास टाटा, बिर्ला, इतर उद्योगपती करत नाहीत. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नसून, कौटुंबिक आणि व्यक्‍तिगत आहेत. कोणाला कार्यक्रमात बोलवायचे हे पवारांचे वैयक्‍तिक अधिकार आहेत. मात्र मला ऐकीव माहिती आहे की, शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता. मुंबईत अदानींना मिळणारे विशेष प्राधान्य हे भाजपाच्या मदतीमुळे मिळते.

अदानी माझे भाऊ – सुप्रिया सुळे
या कार्यक्रमात अदानी दाम्पत्याचे स्वागत करत खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गौतमभाई आणि प्रीतीभाभी मला माझ्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. सुखाचा क्षण असो किंवा दुःखाचा प्रसंग असो, मी पहिला फोन माझे भाऊ अदानी यांना करते.

——————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

नीता अंबानी यांच्या हस्ते पार पडले रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जीवन’ कर्करोग व डायलिसिस केंद्राचे उद्घाटन

रवींद्र धंगेकरांची भाजपाकडून कोंडी ! मुलगा अपक्ष लढणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या