Beed News : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होत. बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतदानाच्या प्रक्रियेला आज सकाळी अत्यंत हिंसक वळण मिळाले. प्रभाग क्रमांक १० येथील मतदान केंद्रावर सुरू झालेला शाब्दिक वादाने टोक गाठले. आणि त्यानंतर भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोरच तुफान दगडफेक केली गेली. दोन्ही गटांकडून झालेल्या या राड्यात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
गेवराई नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पंडित गट आणि भाजपचा पवार गट यांच्यात जोरदार चुरस आहे. मतदानाच्या वेळेस या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. हा तणाव वाढून थेट माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर जाऊन पोहोचला. दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार दगडफेक आणि हल्ला करण्यास सुरवात झाली. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित गटाचे कार्यकर्ते भाजपचे माजी आमदार पवार यांच्या घरासमोर हा गट जमला. यामुळे तणावामध्ये अधिकच भर पडली, आणि अचानक दगडफेक सुरू झाली.
शहरात अचानक निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज देखील केल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर केंद्राबाहेरील गर्दी कमी झाली असून, परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
हे देखील वाचा – Virat Kohli Vs Gautam Gambhir : विराट – गंभीरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी?









