Home / महाराष्ट्र / Beed Protest : बीडमध्ये तुफान राडा…दगडफेकीत एसटी गाड्यांचे जबरदस्त नुकसान; दगडफेकीत सहभागी झालेल्यांवर गुन्हा दाखल..

Beed Protest : बीडमध्ये तुफान राडा…दगडफेकीत एसटी गाड्यांचे जबरदस्त नुकसान; दगडफेकीत सहभागी झालेल्यांवर गुन्हा दाखल..

Beed Protest : बीड जिल्ह्यातील केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) चौकात सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनाला (Protest...

By: Team Navakal
Beed Protest

Beed Protest : बीड जिल्ह्यातील केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) चौकात सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनाला (Protest )हिंसक वळण मिळताना दिसत आहे. महामंडळाच्या अनेक बस गाड्यांची तरुणांकडून तोडफोड देखील करण्यात आली आहे. काही प्रवाशांना देखील दगड लागल्याने ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती होती.

बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला होता. अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन तासाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू असल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. पोलिसांकडून आदोलनाकर्त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी विनंती देखील करण्यात आली. पण आदोलकांनी याला समाधानकारक असा प्रतिसाद दिला नाही .

पोलिसांनी मध्यस्थी करूनही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. मागणी मान्य होत नसल्याने काही तरूण भलतेच आक्रमक झाले होते. त्यांनी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करायला सुरवात केली. दगडफेकीत काही एसटी गाड्यांचे नुकसान झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती. प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच आंदोलनकर्त्यांची वाढती आक्रमकता पाहता पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आणि आता या पार्श्वभूमीवर या दगडफेकीत सहभागी झालेल्या तब्बल ३०० महिला आणि पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे देखील वाचा Rahul Gandhi : बिहारमधील जागावाटपाचा गतिरोध सुटणार का? राहुल गांधींचा थेट लालू यादव यांना फोन..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या