Home / महाराष्ट्र / Bengal Assembly : बंगालमध्ये भाजपा आमदाराला विधानसभेतूनच फरफटत नेले!

Bengal Assembly : बंगालमध्ये भाजपा आमदाराला विधानसभेतूनच फरफटत नेले!

Bengal Assembly

Bengal Assembly : पश्चिम बंगालमधील विधानसभेत आज सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress)आणि भाजपा आमदार (BJP MLA) यांच्यामध्ये तुफान राडा झाला. भाजपाचे मुख्य प्रतोद शंकर घोष (Shankar Ghosh)यांना मार्शलने फरफटत सभागृहाबाहेर काढले. राज्याबाहेरील बंगाली नागरिकांवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी भाजप आमदार जोरदार घोषणा देऊ लागले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee)प्रचंड गदारोळातच बोलत होत्या. त्यावेळी भाजपा आमदारांच्या घोषणांचा आवाज वाढला. भाजपाने विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या मंगळवारी झालेल्या निलंबनावर प्रश्न उपस्थित करत घोषणा दिल्या. याला टीएमसी आमदारांनी तीव्र विरोध केला. दोन्ही बाजूंचे आमदार आमनेसामने आले. अगदी हाणामारी झाली.

या गदारोळातच विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना सभागृहातून निलंबित केले. घोष यांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार दिल्याने मार्शल बोलवण्यात आले. मार्शलने त्यांना अक्षरशः फरफटत सभागृहाबाहेर नेले. त्याचवेळी घोष हे बेशुद्ध पडले. रूग्णवाहिकेतून त्यांना थेट रूग्णालयात नेण्यात आले. घोष यांच्यासोबतच भाजपाचे आमदार अग्निमित्र पॉल आणि मिहिर गोस्वामी यांनाही निलंबित करण्यात आले.

सभागृहातील या प्रकारावर भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी टीका केली. आज पश्चिम बंगालच्या विधानसभेत ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुलाम प्रशासनाने लोकशाहीची हत्या केली, असा आरोप केला. १ सप्टेंबरपासून पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्यात आले. आज कामकाजाचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी हा राडा झाला. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

शेअर बाजारात माफक तेजीजी ; एसटी निर्णयांचा परिणाम

भाजपा प्रवेशासाठी गाडी सजलीपण खेडेकरांचा प्रवेश लटकला!

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना देणार 2500 रुपये