BEST Bus – मुंबईकरांची (Mumbai)विश्वासाची व संपूर्ण भारतात नावाजलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public transport service,)म्हणून गणली गेलेली बेस्ट सेवा आता तोट्यात आली आहे. आवश्यक तितक्या बेस्ट बस पुरवठा न करणाऱ्या पुरवठादाराशीच बेस्टने आणखी बस पुरवठ्याचा करार केला आहे.
बेस्टने २०२३ साली इव्हे ट्रान्स प्रा. लिमिटेड या कंपनीबरोबर २१०० बस पुरवण्याचा करार (Agreement)केला. त्यासाठी वेट लिज करण्यात आले. वेट लिज म्हणजे कर्मचाऱ्यांसह बसेस भाड्याने घ्यायच्या व प्रतिकिलोमीटर प्रमाणे पैसे द्यायचे. मात्र आतापर्यंत या कंपनीने बेस्टला केवळ ६८० बसचा पुरवठा केला आहे. यातील प्रत्यक्ष सेवेत केवळ ६६२ बस आहेत. बेस्टला त्यामुळे बसचा तुटवडा पडून नुकसान झेलावे लागत आहे. या परिस्थितीत बेस्टने याच कंपनीकडे आणखी २४०० बस पुरवठा करण्याचा करार केला आहे.
त्यासाठी त्यांना आधीच्या दरापेक्षा ५८ टक्के (58% higher)अधिक प्रतिकिलोमीटर दर दिला जाणार आहे. ज्या कंपनीने गेल्या ३ वर्षात पहिली ऑर्डर पूर्ण केली नाही त्याच कंपनीला पुन्हा ऑर्डर देण्यात कोणाचा काही आर्थिक लाभ आहे का अशी चर्चा सुरु आहे. २०१८ साली सुरु झालेल्या या कंपनीचे मुख्यालय हैद्राबाद इथे असून या कंपनीने अहमदाबाद (Ahmedabad), मुंबई, पुणे, सुरत, सिल्हासा, गोवा, हैद्राबाद, डेहराडून, बंगळुरु, तिरुपती, नागपूर (Nagpur)आणि पद्दूचेरी या ठिकाणीही बस पुरवठ्याचे काम मिळवलेले आहे. या कंपनीवर अचानक ही मेहेरनजर का व कोण करते अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.
हे देखील वाचा –
शबरीमला चोरीचे सोने बंगळुरू येथून जप्त
ठाकरे हे घरात बसलेले अजगर! भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक









