Bhide Bridge Pune :काही महिन्यांपासून भिडे पूल (Bhide Bridge) मेट्रो पुलाच्या कामामुळे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नारायण पेठ, डेक्कन, जिमखाना परिसरातील वाहनचालकांना ट्रॅफिकचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचण्यासाठी देखील मोठा असा फेरा मारावा लागत होता.
वाहतुकीत येणाऱ्या अडी अडचणी आणि दैनंदिन गर्दी लक्षात घेऊन नागरिकांकडून भिडे पूल(Bhide Bridge) पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने करत होते. अखेर प्रशासनाने ही मागणी मान्य करत शनिवारपासून पूल पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आता या’ वेळेत करा पुलावरून बिनधास्त प्रवास:
वाहतूक पोलिसांनी(Police) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भिडे पुलावरून वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. परंतु,मेट्रो पुलाच्या बांधकामासाठी आवश्यकतेनुसार रात्री १० नंतर या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पोलिस उपआयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.”भिडे पुलावरील वाहतुकीचा निर्णय हा तात्पुरता आहे. पुढचा आदेश येईपर्यंत सध्याची वाहतूक व्यवस्था हि कायम राहील. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.” या निर्णयामुळे डेक्कन, नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा –
Deepika Padukone: हिजाबवरून दीपिकाला केलं ट्रॉल; हिजाब परिधानकरून दीपिकाच जाहिरात शूट..