Bhide Bridge Pune : डेक्कन मेट्रो स्टेशनला पादचारी पूल जोडण्यासाठी भिडे पुलावर मेट्रोकडून पूल उभारण्यात येत आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक गेले काही महिने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता १४ नोव्हेंबरपर्यंत हा पूल दिवसरात्र वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
डेक्कन मेट्रो स्टेशनला प्रवाशांना ये-जा करण्यासाठी तसेच अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी भिडे पुलावर पादचारी पूल उभारणायचे काम सुरु आहे. या कामामुळे पूल काही महिन्यांपासून बंद ठेवावा लागला होता. गणेशोत्सव काळात तात्पुरता हा पूल खुला करण्यात आल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले होते. वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीनंतर, पुलाचे काम हे आता रात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान दररोज रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत पुलावर वाहतूक बंद राहील. या निर्णयामुळे वाहनधारकांना मध्यवर्ती भागात जाण्यासाठी सोयीचे होणार आहे.
हे देखील वाचा –









