Home / महाराष्ट्र / Bhigwan Case Update : भिगवण कथित अपहरण प्रकरण: प्रेमाखातर पलायन केल्याचा तरुणीचा खुलासा; आमदार राहुल कुल यांच्यावरील आरोपांनी राजकीय वातावरण तापले

Bhigwan Case Update : भिगवण कथित अपहरण प्रकरण: प्रेमाखातर पलायन केल्याचा तरुणीचा खुलासा; आमदार राहुल कुल यांच्यावरील आरोपांनी राजकीय वातावरण तापले

Bhigwan Case Update : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एक वेगळे वळण प्राप्त झाले असून, या घटनेवरून...

By: Team Navakal
Bhigwan Case Update
Social + WhatsApp CTA

Bhigwan Case Update : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एक वेगळे वळण प्राप्त झाले असून, या घटनेवरून तालुक्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सुरुवातीला अपहरणाचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली होती; मात्र संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणातील गुंता सुटला आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबा मध्ये तरुणीने स्पष्ट केले की, तिचे कुणीही अपहरण केलेले नसून ती स्वतःच्या मर्जीने आणि प्रेमाखातर प्रियकरासोबत निघून गेली होती. गेल्या एक वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि एकमेकांवरील विश्वासामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे.

या प्रकरणावरून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. “तक्रार दाखल झाल्यापासून मी मुलीच्या नातेवाईकांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या सतत संपर्कात होतो. माझ्यावर होत असलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत,” असे आमदार कुल यांनी म्हटले आहे. आपल्यालाही मुलगी असून घरातील महिला पदाधिकाऱ्यांचा आपण सन्मान राखतो, असे सांगत त्यांनी भावनिक साद घातली. आपली भूमिका नि:पक्षपाती असल्याने काही हितशत्रू दुखावले गेले असावेत आणि त्यातूनच या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. “गुन्हेगार कोण आहेत हे मी ओळखत नाही आणि कोणाच्या सोशल मीडिया स्टेटसशी माझा संबंध नाही, माझ्या फोनचे रेकॉर्डिंग तपासावे,” असे आव्हानही त्यांनी दिले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दुसरीकडे, या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरूच आहे. पीडित तरुणीच्या आईने थेट आरोप केला आहे की, यातील संशयित आरोपी अझर शेख याला आमदार राहुल कुल यांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या दबावामुळेच त्यांची मुलगी अशा प्रकारे वागत आहे. “हिंदू समाजाने आता जागृत होण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन करत त्यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या