Home / महाराष्ट्र / Bhivandi Road Pothole’s : खड्ड्यांमुळे गमवावा लागला जीव, अजून एका जीवाचं स्वप्न उध्वस्थ; भिवंडीतील धक्कादायक घटना..

Bhivandi Road Pothole’s : खड्ड्यांमुळे गमवावा लागला जीव, अजून एका जीवाचं स्वप्न उध्वस्थ; भिवंडीतील धक्कादायक घटना..

Bhivandi Road Pothole’s : सुरक्षित रस्ते (Roads) असणं हे फक्त एक स्वप्नच राहणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून भिवंडीतील सर्वच ठिकाणच्या...

By: Team Navakal
Bhivandi Roads Pothole's

Bhivandi Road Pothole’s : सुरक्षित रस्ते (Roads) असणं हे फक्त एक स्वप्नच राहणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून भिवंडीतील सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याचं दिसून येत आहे. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कायमच दुर्लक्ष केले जाते; त्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आल्यास दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताच्या (Accident) मालिका सुरूच असल्याचं दिसून येत आहे. अशी स्थिती असतानाही रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जुने नाते आहे. मागील काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत असलेल्या भिवंडी शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र अजूनही दयनीयच आहे. याचा वाहनचालकांना मात्र मोठा फटका बसतोय. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग कमी कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पर्यायाने वेळेची कमी यांसारख्या समस्या उत्भवत आहेत. तर काही वेळेला अपघातासारख्या मोठ्या आणि गंभीर घटना तोंड द्यावं लागत आहे.

अशीच एका अपघाताची घटना भिवंडीत घडली आहे. भिवंडीतील खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एकाचा जीव गेला आहे. या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. भिवंडी कल्याण मार्गावरील टेमघर परिसरात साईबाबा मंदिराजवळील हि घटना आहे. खड्ड्यांमुळे झालेला हा अपघात इतक्या मोठ्या प्रमाणावर भीषण होता, की अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यांवरील काँक्रीट आणि पेवर ब्लॉकमधील उंचसखल रस्ता, तसंच रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झालायचं समोर आलं आहे.

अपघातात मृत्यू झालेला तरुण राज निरंजन सिंग हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात असताना अचानक रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याची दुचाकी घसरली. दोघेही रस्त्यावर कोसळले आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या एका कंटेनरने राजला चिरडलं. आणि क्षणभरात सगळं संपलं. काही क्षणांपूर्वी हसत – खेळत घरी जाणाऱ्या राजने क्षणार्धात आपले प्राण सोडले. राज हा त्याच्या कुटुंबातील सर्वस्वी एकुलता एक मुलगा होता.

राजच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करत आहेत. राजच्या मृत्यूनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड अशी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा सवाल मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.

दरम्यान, भिवंडीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. या अपघातामुळे मागच्या काही काळात ६ जणांचे बळी गेल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे आजून किती बळी जाणार आहेत असा संतप्त सवाल देखील विचारला जातो आहे.


हे देखील वाचा – ST Bus News : लालपरीच धक्कादायक वास्तव..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या